राजपत्रित वैद्यकीय अधिकारी बेमुदत संपात उतरणार
schedule18 Mar 23 person by visibility 1107 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी कोल्हापूर : जुनी पेन्शन योजनेसाठी सरकारी नियम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपात महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी हे येत्या २८ मार्चपासून सक्रिय सहभाग घेणार आहेत. राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी आंदोलनासंबंधी घोषणा केली.
जुनी पेन्शन योजनेसाठी चौदा मार्चपासून बेमुदत संप सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कर्मचारी मोठ्या संख्येने या संपात सहभागी झाले आहेत. राजपत्रित अधिकाऱ्यांनी या संपाला जाहीर पाठिंबा दिला आहे. जुनी पेन्शन योजनेसाठी सुरू असलेल्या संपातील कर्मचारी रोज टाऊन हॉल येथे एकत्र येऊन आंदोलन करत आहेत. राजपत्रित अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी या ठिकाणी भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाच सोबतीला २८ मार्चपासून संपात सहभागी होत असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकिय अधिकारी गट अ संघटना जिल्हा कोल्हापूरच्या अध्यक्षा डॉ. जेसिका अँड्रयुज यांनी टाऊन हॉल येथील सभेत बोलताना भूमिका स्पष्ट केली. यावेळी संघटना प्रवक्ते डॉ. अमित पोळ यांनी आपल्या भावना
व्यक्त केल्या. डॉ. हर्षल शिखरे, डॉ. शोभा सुर्यवंशी, डॉ. फारुख देसाई, डॉ. मिना बारवाडे उपस्थीत होते. तसेच
महाराष्ट्र राज्य जिल्हा कर्मचारी युनियनचे कार्याध्यक्ष राहुलराज शेळके, महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेचे ( एम.एम. पाटील प्रणित) कार्याध्यक्ष असिफ पठाण, महिला उपाध्यक्षा श्रीमती दमयंती मोराळे, करवीर तालुकाध्यक्ष मोहन जांभळे, पन्हाळा तालुका अध्यक्ष रंगराव लव्हटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.