
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम भागास कायमस्वरूपी जोडण्याकरीता भुयारी मार्ग सर्विस रस्ता बांधण्याकरिता आठ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे. ३तसेच या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मंत्री पाटील म्हणाले, या मुख्य रस्त्यावरून विद्यापीठातील विद्यार्थी, पालक, शिक्षक अशा सुमारे दोन ते तीन हजार नागरिकांची दररोज ये-जा सुरू असते.या रस्त्यावर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून शहरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. वर्दळीमुळे नागरिकांना हा रस्ता ओलांडणे अडचणीचे होत आहे. या ठिकाणी अनेकदा लहान-मोठे अपघाताचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे भुयारी मार्ग व सर्विस रोड साठी आठ कोटी ४८ लाख ८१ हजार रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली आहे