Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मान्यवरांशी संवाद, भेटीगाठीद्वारे कौस्तुभ गावडेंचा प्रचारावर भरमहायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा, नेते अन उमेदवारांच्या उपस्थितीत घोषणासमविचारी आघाडीतर्फे उमेदवारांची घोषणा, सात संचालकाना पुन्हा उमेदवारीगोकुळसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, तीन माजी चेअरमन, बारा संचालकांना उमेदवारी  पदवीधरांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करणार हर्षदा देशमुख -जाधवराधानगरीत राष्ट्रवादीत फूट, प्रा. किसन चौगले  काँग्रेसकडे ! समविचारी आघाडीतून उमेदवारी ! !नाना आगळा - नाना वेगळा…नाना जीवाभावाचा !!मुश्रीफसाहेब मला खाणार आहेत की ? मी त्यांना खाणार आहे ? आमदार शिवाजी पाटलांचे धडाकेबाज विधानमहायुतीच्या उमेदवारांची यादी गुरुवारी दहा वाजता जाहीर होणार, मंत्री मुश्रीफ करणार नावांचे ट्विटगोकुळसाठी महायुतीच्या घडामोडी वेगावल्या, तीन मंत्री -खासदार- आमदारांची उपस्थिती ! आमदार शिवाजी पाटील ही बैठकीला!!

जाहिरात

 

मान्यवरांशी संवाद, भेटीगाठीद्वारे कौस्तुभ गावडेंचा प्रचारावर भर

schedule08 Oct 26 person by visibility 17 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-महायुतीचे उमेदवार तथा शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराला विविध जिल्ह्यांतील भेटीगाठींची जोड मिळत आहे. शिक्षक, शिक्षण संस्था, कर्मचारी संघटना तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद साधत कौस्तुभ गावडे यांच्याकडून शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येत आहे.
प्रचार दौऱ्यादरम्यान कौस्तुभ गावडे यांनी सातारा खासदार उदयनराजे भोसले, ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनील काटकर, सातारा आयटीआय संघटनेचे अध्यक्ष नेताजी बेचले , शिल्पनिदेशक चिंतामणी काटवते, आर. वाय. जाधव तसेच पुणे माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे मार्गदर्शक गुलाबसिंग कदम यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटींमध्ये शिक्षक मतदारसंघातील विविध प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील बदल आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा झाल्याचे  गावडे यांच्या प्रचारातील माहितीत सांगण्यात आले. दरम्यान, विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या या भेटीगाठींमुळे शिक्षक मतदारसंघातील स्थानिक समीकरणे, शिक्षकांच्या अपेक्षा आणि संघटनात्मक संपर्क यांना प्रचारात महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी काळात शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटी, संवादसभा आणि विविध संघटनांशी चर्चा यांच्या माध्यमातून प्रचाराचा विस्तार करण्याची भूमिका कौस्तुभ गावडे यांच्या प्रचार यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes