गोकुळसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, तीन माजी चेअरमन, बारा संचालकांना उमेदवारी
schedule08 Oct 26 person by visibility 280 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीने उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये तीन माजी चेअरमन व बारा माजी संचालकांचा समावेश आहे. २०१५ ते २०२० आणि २०२० ते २०२६ या कालावधीतील संचालकांचा बारा उमेदवारांमध्ये समावेश आहे. दिवंगत आमदार पी. एन. पाटील गटाला एक जागा मिळाली. त्यांचे चिरंजीव राहुल पाटील हे उमेदवार आहेत.
सर्वसाधारण गटातील उमेदवार माजी आमदार राजेश पाटील चंदगड, गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील करवीर, माजी चेअरमन अरुण डोंगळे राधानगरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी. एन. पाटील करवीर, माजी संचालक अजित शशिकांत नरके पन्हाळा, संभाजी रंगराव पाटील करवीर, अजित पाडूरंग पाटील करवीर, विरेंद्र संजय मंडलिक कागल, जनसुराज्यचे माजी संचालक करणसिंह गायकवाड, माजी संचालक अमरसिंह यशवंत पाटील पन्हाळा, माजी संचालक युवराज पाटील कागल, मदन बाबूराव देसाई भुदरगड, माजी संचालक अंबरिश संजय घाटगे, माजी संचालक चेतन अरुण नरके पन्हाळा, अशोक चराटी आजरा, माजी संचालक रणजित कृष्णराव पाटील भुदरगड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश भीमगोंडा पाटील गडहिंग्लज, रणजित दिलीप पाटील शिरोळ, माजी संचालक दीपक भरमू पाटील चंदगड, प्रतापसिंह शंकरराव पाटील करवीर.
महिला गटातून माजी संचालिका शौमिका महाडिक, अर्चना आनंदराव पाटील. इतर मागासवर्गीय गटातून नविद हसन मुश्रीफ, विमुक्त भटक्या जमाती गटातून विश्वास जाधव, अनुसूचित जाती जमाती गटातून माजी संचालक सुजित मिणचेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या नेते मंडळींची बुधवारी बैठक झाली होती. मंत्री चंद्रकांत पाटील,. मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक आमदार विनय कोरे, चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार के पी पाटील, समित कदम आदींच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली होती. राष्ट्रवादी व यड्रावकर गटाला नऊ, भाजप व शिवसेनेला प्रत्येकी सात तर जनसुराज्य शक्ती पक्षाला दोन जागा आहेत. गेल्या संचालक मंडळातील बाळासाहेब खाडे, नंदकुमार ढेंगे आदींचा पत्ता कट झाला. प्रा. किसन चौगले यांनी काँग्रेसची वाट धरली आहे.