Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
समविचारी आघाडीतर्फे उमेदवारांची घोषणा, सात संचालकाना पुन्हा उमेदवारीगोकुळसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, तीन माजी चेअरमन, बारा संचालकांना उमेदवारी  पदवीधरांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करणार हर्षदा देशमुख -जाधवराधानगरीत राष्ट्रवादीत फूट, प्रा. किसन चौगले  काँग्रेसकडे ! समविचारी आघाडीतून उमेदवारी ! !नाना आगळा - नाना वेगळा…नाना जीवाभावाचा !!मुश्रीफसाहेब मला खाणार आहेत की ? मी त्यांना खाणार आहे ? आमदार शिवाजी पाटलांचे धडाकेबाज विधानमहायुतीच्या उमेदवारांची यादी गुरुवारी दहा वाजता जाहीर होणार, मंत्री मुश्रीफ करणार नावांचे ट्विटगोकुळसाठी महायुतीच्या घडामोडी वेगावल्या, तीन मंत्री -खासदार- आमदारांची उपस्थिती ! आमदार शिवाजी पाटील ही बैठकीला!!चचणडडदिल्लीतील सौंदर्य विषयक परिषदेत डॉ. उद्धव पाटील यांचे मार्गदर्शन

जाहिरात

 

समविचारी आघाडीतर्फे उमेदवारांची घोषणा, सात संचालकाना पुन्हा उमेदवारी

schedule08 Oct 26 person by visibility 799 categoryउद्योग

[ महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी राजषीॅ शाहू शेतकरी समविचारी आघाडीतर्फे गुरुवारी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी, शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार जयंत पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, सत्यजित पाटील, राजू आवळे, राजू किसन आवळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उमेदवारांची घोषणा करण्यात आली. समविचारी आघाडीत सात माजी संचालकांचा समावेश आहे.
सर्वसाधारण गटातून माजी संचालक शशिकांत पाटील  चुयेकर करवीर, बाबासाहेब चौगुले करवीर, अभिजीत तायशेटे राधानगरी, राहुल देसाई गारगोटी, सचिन घोरपडे भुदरगड, प्रा. किसन चौगले राधानगरी, सत्यजित सुरेश पाटील करवीर, बाबासाहेब देवकर करवीर, उदय  निवासराव पाटील, करवीर, विद्याधर गुरंबे गडहिंग्लज , विश्वजीत दिनकरराव जाधव तिरवडे भुदरगड,  रणधीर विजयसिंह मोरे सरवडे राधानगरी,  विश्वजीत रणजितसिंह पाटील कागल, भिमगोंडा कल्लाप्पा बोरगावे शिरोळ,  विश्वासराव आनंदराव इंगवले हातकणंगले,  शाहूवाडीतून विकास पांडुरंग पाटील, सुभाष डोंगरे गडहिंग्लज, दादासो सातार्डेकर पन्हाळा, विशाल गोपाळराव पाटील तांबळवाडी चंदगड,  शहाजी केशव पाटील कागल यांचा समावेश आहे. महिला प्रतिनिधी गटातून विद्यमान संचालिका अंजना रेडेकर आजरा , भाग्यश्री धीरज डोंगळे राधानगरी या उमेदवार आहेत. ओबीसी गटातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत करवीर यांची उमेदवारी जाहीर झाली. भटक्या जाती व विमुक्त जमाती मधून माजी संचालक बयाजी शेळके हे उमेदवार आहेत. अनुसूचित जाती-जमातीमधून हातकणंगलेचे माजी आमदार राजू जयवंतराव आवळे यांना उमेदवारी देण्यात आली. पत्रकार परिषदेला सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, गोपाळराव पाटील, रामराजे कुपेकर, सुनील शिंद उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes