राधानगरीत राष्ट्रवादीत फूट, प्रा. किसन चौगले काँग्रेसकडे ! समविचारी आघाडीतून उमेदवारी ! !
schedule08 Oct 26 person by visibility 219 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जागा वाटपावरुन महायुतीमध्ये मोठी धुसफूस सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी डावलल्यामुळे माजी संचालक प्रा. किसन चौगले यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली. आमदार पाटील यांनी समविचारी आघाडीतून प्रा. चौगले यांची उमेदवारी जाहीर केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए वाय पाटील यांनी महायुतीत प्रवेश केला. ए.वाय. पाटील यांच्या महायुतीमधील प्रवेशावरुन राष्ट्रवादी काँग्रेस राधानगरीत धुसफूस होती. महायुतीमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे चौगले यांनी काँग्रेसची वाट धरली.