मुश्रीफसाहेब मला खाणार आहेत की ? मी त्यांना खाणार आहे ? आमदार शिवाजी पाटलांचे धडाकेबाज विधान
schedule07 Oct 26 person by visibility 208 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून मंत्री हसन मुश्रीफ व आमदार शिवाजी पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष चर्चेचा ठरला आहे. काही दिवसापूर्वी आमदार पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचे राजकारण हे अजगरासारखे आहे अशी टीका करत खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या धडाकेबाज विधानाची प्रचिती बुधवारी 7 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा आली हॉटेल पॅव्हेलियन येथे महायुतीच्या नेते मंडळींची बैठक आयोजित केली होती . या बैठकीसाठी आलेल्या आमदार पाटील यांना पदाधिकाऱ्यांनी चेष्टेने महायुतीच्या नेते मंडळीसोबत मंत्री मुश्रीफ देखील आहेत असे म्हटले. त्यावर क्षणाचाही विलंब न करता आमदार पाटील यांनी, ' मुश्रीफ साहेब मला खाणार आहेत ? की मी त्यांना खाणार आहे ? चला बघू ' असे धडाकेबाज विधान केले. त्यांच्या या विधानानी उपस्थितांची मात्र हसता हसता पुरेवाट झाली.
गोकुळ निवडणुकीचा उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आठ ऑक्टोबर 2026 रोजी संपत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला महायुतीमधील नेते मंडळींची बैठक बुधवारी सायंकाळी हॉटेल पॅवेलियन येथे झाली. मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार के पी पाटील, समित कदम बैठकीला उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आमदार शिवाजी पाटील हे हॉटेल पॅव्हेलियन येथे पोहोचले. त्यांनी बैठक कुठे सुरू आहे असे विचारणा केली.भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे हे त्यांना नेतेमंडळींची ज्या रूम मध्ये बैठक सुरू होती तिकडे घेऊन जात होते. यावेळी त्या रूम बाहेरील एका पदाधिकाऱ्याने, ' बैठकीला मंत्री मुश्रीफ असल्याचे' आमदार पाटील यांना सांगितले. त्यावर आमदार पाटील यांनी, ' मुश्रीफ साहेब मला खाणार आहेत ? की मी त्यांना खाणार आहे ? बघू या चला.' असे चेष्टेने म्हणत रूम मध्ये गेले. त्यांच्या या विधानानी उपस्थितांना हसू आवरले नाही. राजकारणाचा सारा माहोल बदलून गेला.