Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
च्च ठठमहायुतीच्या उमेदवारांची यादी गुरुवारी दहा वाजता जाहीर होणार, मंत्री मुश्रीफ करणार नावांचे ट्विटगोकुळसाठी महायुतीच्या घडामोडी वेगावल्या, तीन मंत्री -खासदार- आमदारांची उपस्थिती ! आमदार शिवाजी पाटील ही बैठकीला!!चचणडडदिल्लीतील सौंदर्य विषयक परिषदेत डॉ. उद्धव पाटील यांचे मार्गदर्शन कोल्हापुरात भाजपातर्फे ज्योती यात्रा उत्साहात, शहरातून मोटरसायकल रॅलीवंचितांच्या सिनेमावर सखोल अभ्यास आवश्यक : मेघराज राजेभोसलेमहायुतीत एकमत होईना, उमेदवारांची घोषणा गुरुवारीचपुणे शिक्षक मतदारसंघासाठी ६७ अर्ज ! ४० हून अधिक उमेदवार !!माळी समाजाच्या घरगुती गणेश सजावट, झिम्मा फुगडी स्पर्धेला प्रतिसाद, बक्षीस समारंभ उत्साहात

जाहिरात

 

महायुतीच्या उमेदवारांची यादी गुरुवारी दहा वाजता जाहीर होणार, मंत्री मुश्रीफ करणार नावांचे ट्विट

schedule07 Oct 26 person by visibility 491 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळ दूध संघासाठी महायुतीमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून गुरुवारी 8 ऑक्टोबर 2026 रोजी उमेदवारांची नावे घोषित करण्यात येणार आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे ट्विटद्वारे उमेदवारांची नावांची घोषणा करतील. महायुतीच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी नेतेमंडळींची बुधवारी सायंकाळी हॉटेल पॅव्हेलियन येथे बैठक झाली. जवळपास दीड तासाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन  गुरुवारी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील असे  सांगितले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भातील माहिती दिली. गोकुळ दूध संघासाठी   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नऊ जागा, भारतीय जनता पक्ष व शिवसेनेला प्रत्येकी सात जागा आणि जनसुराज्य पक्षाला दोन जागा असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. पत्रकार परिषदेला मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार  संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार के पी पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम आदी उपस्थित होते. अकरा तारखेला महायुतीचा प्रचार मेळावा महासैनिक दरबार हॉल येथे  होणार आहे. दरम्यान बुधवारी सायंकाळी झालेल्या नेते मंडळींच्या पत्रकार परिषदेमध्ये कोणत्या संवर्गातून कोण उमेदवार असणार या संदर्भातील अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes