+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेश क्षीरसागर धावले पूरग्रस्तांच्या भेटीला, भर पावसात विविध ठिकाणांची पाहणी adjustकाँग्रेसकडून सतेज पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी ! समन्वय समितीत स्थान ! adjustजयंती नाल्यावर पाणी, वाहतुकीसाठी मार्ग बंद adjust४०९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ! सीईओंनी शब्द पाळला, शिक्षणाधिकाऱ्यांचे गतीमान कामकाज !! adjustपावसाचा रपाटा- पाण्याचा विळखा कायम ! घरांची पडझड, नागरिकांचे स्थलांतर!! adjustकास्ट्राइब शिक्षक संघटना कोल्हापूरतर्फे आरक्षण दिन साजरा adjustपूरग्रस्त कुंभार समाजाच्या मदतीसाठी भाजपाची जिल्हा प्रशासनाकडे धाव adjustभारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा adjustजबाबदारीने पेलतेय तरुण पिढी शिक्षण संस्थांची कामगिरी adjustदेवराज बोटिंग क्लबने रंकाळा तलावातील कचरा हटविला
1000653813
1000630884
1000621806
1000615695
schedule04 Dec 23 person by visibility 328 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
एकतर्फी प्रेमातून युवतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी देऊ बजू बोडके (वय २६ रा. धनगर वसाहत, बोंद्रेनगर, फुलेवाडी) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. जगताप यांनी पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. या खटल्यात अॅडव्होकेट मंजुषा पाटील यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिजे.
या खटल्याची माहिती अशी की, फुलेवाडी रिंगरोड बोंद्रेनगर धनगर वसाहतीमध्ये गरीब कुटुंबातील महिला धुण्याभांड्याची कामे करतात. या खटल्यातील १९ वर्षाची युवती आजी आणि बहिणी सोबत राहत होती. तीही धुण्या भांड्याची कामे करत होती. धुण्याभांड्याच्या कामानिमित्त ती बाहेर जात असे. आरोपी देऊ बोडके, त्याचा मित्र चौडू बोडके, राजू सोनबा शेळके, संजय सोनबा शेळके, पांडुरंग बाबू शेळके, बबन नागू शेळके ही मुले कामधंदा न करता दिवसभर टिंगल टवाळी करत असत. आरोपी देऊ बोडके हा युवतीचा सातत्याने पाठलाग करत असे. ती कामाला जात असलेल्या नागाळा पार्क परिसरात जाऊन तिला अडवून 'तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला संपवणार' अशी धमकीही दिली होती.
 देऊ बोडके याच्या सातत्याने होत असणाऱ्या धमकीमुळे युवतीने १९ जून २०१६ रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र अशोक सानप यांनी तपास करून कोर्टात आरोपपत्र सादर केले.
 न्यायमूर्ती एस. एस. जगताप यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी दहा साक्षीदार तपासले. मयत युवतीची चुलत बहीण, नातेवाईक राजाराम शेळके, पांडुरंग बोडकर राजाराम बोरकर, यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. मयत युवतीची मैत्रीण व जवळचे नातेवाईक या खटल्यात फितूर झाले. साक्षीदारांचा जाबजबाब , पुरावा आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश जगताप यांनी आरोपी देऊ बोडके याला पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.