Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर सारस्वत विकास मंडळातर्फे रविवारी खाद्य महोत्सव- कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन न्यू कॉलेजच्या कँपसमध्ये अवतरलीय ग्रामीण संस्कृती! बाजरीचा केक, गुळांबा, वाळवण पदार्थआता लढाई गोकुळसाठी, निवडणुकीचे वाजले बिगुलशिक्षकांच्या फरक बिलाची रक्कम शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडेपदवीधर मतदारांच्या जागृतीसाठी पदवीधर संघटना मैदानात ! प्राध्यापक - शिक्षकांचा पुढाकार !!दूध संस्था कर्मचारी संघटनेमार्फत गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा सत्कारशुक्रवारी लख लख चंदेरी कार्यक्रमईएसआय हॉस्पिटलमध्ये लवकरच शंभर बेडची सुविधापाचगावमध्ये डीवाय पाटील मेडिकल कॉलेजचे  श्रमसंस्कार शिबीर जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड 20 मार्चपूर्वी होणार

जाहिरात

 

न्यू कॉलेजच्या कँपसमध्ये अवतरलीय ग्रामीण संस्कृती! बाजरीचा केक, गुळांबा, वाळवण पदार्थ

schedule26 Feb 26 person by visibility 36 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : बाजरीचा केक, गुळांबा, औषधी वनस्पती,  आयुर्वेदिक उत्पादने , सेंद्रिय भाजीपाला आणि वाळवण पदार्थ... अस्सल ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध वस्तूंचे प्रदर्शन येथील न्यू कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सुरू आहे. अवनि संस्था आणि न्यू कॉलेज समाजशास्त्र व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 26 व 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हे प्रदर्शन दिवसभर खुले आहे. कष्टकरी,  शेतकऱ्यांच्या उत्पादनांचे हे प्रदर्शन ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवत आहे.
या प्रदर्शनात भाजीपाला, वाळवण पदार्थ, धान्य व पीठ, औषधी वनस्पती सेंद्रिय बिया अशा नानाविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. आयुर्वेदिक उत्पादनांचाही समावेश आहे. सांडगे, पापड, कुरडई, शेवया प्रदर्शनाची लज्जत  वाढवत आहेत. सेंद्रिय उत्पादने हे या प्रदर्शनाचे आणखीन एक वैशिष्ट्य होय. सेंद्रिय शेतीतील भाजीपाला, टोमॅटो, मिरची, मुळाची शेंग, कच्चा फणस, नाचणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. सेंद्रिय गुळ व गुळ पावडर प्रदर्शनाचा गोडवा वाढवत आहे. नैसर्गिक मध येते आहे.  गोठणे ग्रामपंचायत अंतर्गत विविध उत्पादित वस्तूंचे स्टॉल हे प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. तसेच महात्मा गांधी फाउंडेशन वअवनि संस्था संचलित कस्तुरबा गांधी सेंद्रिय शेती प्रकल्पाचा नमुना ही येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहे. अवनि संस्थेच्या कमवा व शिका उपक्रमांतर्गत तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन के जे पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. अवनि संस्थेच्या अनुराधा भोसले यांनी प्रास्ताविक केले.
 याप्रसंगी न्यू कॉलेजचे प्राचार्य व्ही एम पाटील, उपप्राचार्य रघुनाथ ढमकले, रजिस्टार श्रीमती एन.वाय. कांबळे  , समाजशास्त्र विभागप्रमुख अर्चना जगतकर,  वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख  महेंद्र वाघमारे भोगावती कारखान्याचे संचालक बी  ए पाटील, प्रा. अरविंद घोडके,  वाय एस चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.  प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी माया जोगडे,केदार पाटील, साताप्पा मोहिते  आदी प्रयत्नशील आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes