Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आता लढाई गोकुळसाठी, निवडणुकीचे वाजले बिगुलशिक्षकांच्या फरक बिलाची रक्कम शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडेपदवीधर मतदारांच्या जागृतीसाठी पदवीधर संघटना मैदानात ! प्राध्यापक - शिक्षकांचा पुढाकार !!दूध संस्था कर्मचारी संघटनेमार्फत गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा सत्कारशुक्रवारी लख लख चंदेरी कार्यक्रमईएसआय हॉस्पिटलमध्ये लवकरच शंभर बेडची सुविधापाचगावमध्ये डीवाय पाटील मेडिकल कॉलेजचे  श्रमसंस्कार शिबीर जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड 20 मार्चपूर्वी होणार नागरी सुविधांबाबत कोल्हापूर नेक्स्टच्या सदस्यांची महापौरसोबत चर्चा मुख्याध्यापक अर्जित रजा रोखीकरणावर  लवकरच मार्ग काढू : शिक्षणमंत्री दादा भुसे

जाहिरात

 

शिक्षकांच्या फरक बिलाची रक्कम शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे

schedule26 Feb 26 person by visibility 43 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील  चार हजार १५५  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची  ३५ कोटी ४६ लाख ६५ हजार ९८० रूपये इतकी फरक बिलाची रक्कम मंजूरीसाठी २ फेब्रुवारी रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठविली असून या कार्यालयाकडून ही बिले अंतरिम मंजूरीसाठी शिक्षण संचालक कार्यालय पुणे यांच्याकडे  पाठविली जातात. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी  दिली आहे. यामध्ये वरिष्ठ वेतन श्रेणी फरक,  कोर्ट केसेस बील, महागाई भत्ता फरक, शिक्षण सेवक  टोटल  पगार फरक बील, सहावा व सातवा वेतन आयोग फरक, पदोन्नती फरक, वार्षिक वेतन वाढ फरक, निवड श्रेणी फरक, चालू आर्थिक वार्षिक फरक, निलंबित कालावधीतील फरक बीले आदी प्रकारची बील काढून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठविले आहेत अशी माहिती वेतन पथकाचे अधिक्षक उदय सरनाईक यांनी दिली. ४१५५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची फरक बीले माध्यमिक शिक्षण विभागाकडून वेळेत सादर झाली आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes