Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा – चेअरमन नविद मुश्रीफगोकुळमध्ये मंत्री मुशीफांना सोडून युती करावी, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा - आमदार शिवाजी पाटीलविवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांचे निधन बागेश्वर महाराजवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, कोल्हापुरात शिवभक्तांची मागणीविवेकानंद  कॉलेजमध्ये  राजेंद्र साळुंखे  यांचा  सेवानिवृत्तीनिमत्त सत्कारशहर स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास आरोग्य निरीक्षक - मुकादमांवर कारवाई ! आयुक्त करणार पहाटेही तपासणी ! !जिपच्या स्थायी सभेत ग्रामीण प्रश्नांना वाचा, गारगोटीतील पाणी योजनेचे काम संथगतीने !गैरहजर अधिकाऱ्याना नोटिस !!गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश- नविद मुश्रीफ यांची माहिती कोरोनाशी भिडताना हे पुस्तक एका संकटाचा दस्ताऐवज नसून मानवी जिद्दीची गाथा - मंत्री हसन मुश्रीफरूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसे

जाहिरात

 

कोल्हापूर सारस्वत विकास मंडळातर्फे रविवारी खाद्य महोत्सव- कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रदर्शन

schedule26 Feb 26 person by visibility 281 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर सारस्वत विकास मंडळातर्फे रविवारी १ मार्च २०२६ रोजी  खाद्य महोत्सव आयोजित केला आहे. हा महोत्सव अक्षता मंगल कार्यालय, ताराराणी चौक येथे  होणार आहे.या खाद्य महोत्सवामध्ये पारंपरिक सारस्वतीय तसेच विविध प्रांतातील सारस्वतीय स्वादिष्ट पदार्थ आणि मासे इत्यादींचा आस्वाद घेण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. घरगुती चव, खास सारस्वतीय पाककृती, पारंपरिक गोडधोड, स्नॅक्स तसेच विविध प्रकारचे मासे व समुद्री खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल्स यामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच विविध कलाकुसर वस्तू  स्टॉल असणार आहेत.

सारस्वत समाजातील महिला व युवकांना त्यांच्या पाककौशल्याचे सादरीकरण करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. या निमित्ताने समाजातील एकोप्याला व सांस्कृतिक जपणुकीला चालना मिळणार आहे. खाद्यप्रेमी नागरिकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध पदार्थांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे प्रदर्शन सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुले असणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : माधुरी मोदी (९११२०४१९७५), सुमंगला पै  (83 29 56 0 600)  व सचिन जनवाडकर (84 83 89 46 72 ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes