शुक्रवारी लख लख चंदेरी कार्यक्रम
schedule25 Feb 26 person by visibility 189 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंच, नादब्रह्म आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘लख लख चंदेरी कोल्हापुरी साज ’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या पासून सुरु झालेला चित्रपट प्रवास दृकश्राव्य माध्यमातून उलगडत आहे. याप्रसंगी सिनेमा संगीत अभ्यासक सुलभा तेरणीकर, व्हिडीओग्राफी उस्मान शेख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मराठी गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम राम गणेश गडकरी सभागृह येथे सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक मिलिंद गुणे, डॉ सुरेश देशपांडे, प्रशांत जोशी यांनी केले आहे.