Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आता लढाई गोकुळसाठी, निवडणुकीचे वाजले बिगुलशिक्षकांच्या फरक बिलाची रक्कम शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडेपदवीधर मतदारांच्या जागृतीसाठी पदवीधर संघटना मैदानात ! प्राध्यापक - शिक्षकांचा पुढाकार !!दूध संस्था कर्मचारी संघटनेमार्फत गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा सत्कारशुक्रवारी लख लख चंदेरी कार्यक्रमईएसआय हॉस्पिटलमध्ये लवकरच शंभर बेडची सुविधापाचगावमध्ये डीवाय पाटील मेडिकल कॉलेजचे  श्रमसंस्कार शिबीर जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड 20 मार्चपूर्वी होणार नागरी सुविधांबाबत कोल्हापूर नेक्स्टच्या सदस्यांची महापौरसोबत चर्चा मुख्याध्यापक अर्जित रजा रोखीकरणावर  लवकरच मार्ग काढू : शिक्षणमंत्री दादा भुसे

जाहिरात

 

आता लढाई गोकुळसाठी, निवडणुकीचे वाजले बिगुल

schedule26 Feb 26 person by visibility 23 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रमुख आर्थिक संस्था समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय निबंधक सहकारी संस्थेने गोकुळकडे मतदारयादीची मागणी केली आहे. यासंबंधीचे पत्र बुधवारी दूध संघाला पाठविले असून लवकर मतदारयादी सादर  करावी अशा सूचना केल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर कामकाज सुरू झाल्यामुळे गोकुळच्या निवडणुका मुदतीत होणार याची खात्री बळावली आहे.

दोन मार्च २०२६ पूर्वीच्या पात्र मतदार संस्थांची यादीची सॉफ्ट कॉपी सादर करावी असे पत्रात म्हटले आहे. गोकुळचे एकूण जिल्ह्यात ५४७० इतके पात्र सभासद आहेत. यामध्ये करवीर तालुक्यात सर्वाधिक ८६८, राधानगरीत ७०३, कागल ६२२, भुदरगड ५९८, पन्हाळा ५१९, शाहूवाडी ४५१, चंदगड ४२६, गडहिंग्लज ४०२, आजरा ३०८, शिरोळ २७४, हातकणंगले १६७, तर गगनबावडा तालुक्यात १३२ पात्र मतदार आहेत. गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत चार मे २०२६ रोजी संपत आहे. २०२१ मधील गोकुळच्या निवडणुकीत तीन हजार ६४७ संस्थांचे ठराव दाखल झाले होते. त्यापैकी तीन हजार ६३९ ठरावदारांनी मतदान केले होते. यमध्ये २७५२ पुरुष तर ८८७ महिला ठरावदारांचा समावेश होता. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा १८२३ संस्था वाढल्या आहेत. दरम्यान गोकुळच्या संचालकांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी गोकुळचे संचालक मंडळ २१ जणांचे असायचे आता संचालकांची संख्या २५ झाली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes