गजानन नागरी पतसंस्थेचा पंधरा टक्के लाभांश
schedule20 Sep 22 person by visibility 612 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : पाटोळेवाडी येथील गजानन नागरी सहकारी पतसंस्थेने पंधरा टक्के लाभांश जाहीर केल्याची माहिती अध्यक्ष राजाराम पाटोळे यांनी दिली.
पतसंस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा राजगौरव मंगल कार्यालय येथे खेळीमेळीत झाली. मुख्य व्यवस्थापक अजित पाटोळे यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. अध्यक्ष पाटोळे यांनी संस्थेमार्फत राबविलेल्या विविध उपक्रमांची, ठेव योजनांची माहिती दिली. संस्थेच्या ४५ कोटी ठेवी आहेत. ३३ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेमार्फत लेक वाचवा, मृत्यूजंय ठेव योजना, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचे आयोजन केले असे त्यांनी सांगितले.
संचालक नंदकुमार पाटोळे, सतीश पाटोळे, प्रा. सुनील भोसले, दिलीप पाटोळे, किरण पाटोळे, राजाराम तोडकर, राजेंद्र भोसले, रुपाली पाटोळे, धनंजय सरदेसाई, नितीन पाटोळे उपस्थित होते. उपाध्यक्ष अमृता पाटोळे यांनी आभार मानले.