नागोजीराव पाटणकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थी महास्नेह मेळावा उत्साहात
schedule27 May 23 person by visibility 252 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : रंकाळावेश येथील श्री बी.एन. पाटणकर ट्रस्ट संचलित नागोजीराव पाटणकर हायस्कूल व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थी महास्नेह मेळावा उत्साहात झाला.नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात प्रमुख पाहुणे होते.
ट्रस्टचे चेअरमन आर. ए. उर्फ बाळ पाटणकर, संस्थेचे विश्वस्त एन्. एल्. ठाकूर व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सचिन जरग यांची प्रमुख उपस्थिती होती.
थोरात म्हणाले, “ मी, जीवनामध्ये शिक्षकांच्यामुळेच घडलो. शिक्षक दोन प्रकारचे प्रभावी व महान शिक्षक असतात. स्वतःच्या हातून कांही चुकीचे घडल्यास त्याची जवाबदारी स्वतःवर घ्यावी त्याचे खापर दुसऱ्यावर फोडू नये, नेहमी खरे बोलावे स्वतःतील 'मी' दूर ठेवला जीवनात यशस्वी व्हाल. जीवनाला दिशा देणारा शिक्षकच असतो. विद्यार्थ्यांनो अहंकारा दूर ठेवा, यश तुमचेच आहे. " ट्रस्टचे चेअरमन बाळ पाटणकर यांनी, “बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी असणारी ही शाळा आहे. संस्था, शिक्षक, व माजी विद्यार्थी यांची नाळ जुळावी, शाळेशी माजी विद्यार्थ्याचा संपर्क व्हावा हा मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. तसेच शाळेमध्ये 'माजी विद्यार्थी संपर्क कक्ष' सुरू करीत आहे.”अशी घोषणा केली.
“नागोजीराव पाटणकर हायस्कूलला ऐतिहासिक वारसा लाभला आहे कै. सरदार भिमराव नागोजीराव पाटणकर यांनी 'बहुजन हिताय ! बहुजन सुखाय' हे ब्रीदवाक्य डोळयासमोर ठेवून सन १९५५ मध्ये बी. एन. पाटणकर ट्रस्टची स्थापना केली. आज या संस्थेच्या नागोजीराव पाटणकर हायस्कूल, मराठी शाखा, अभिनव बालक मंदिर या शाखा सुरु केल्या आहेत. या संस्थेत एक हजार विद्यार्थी दर्जेदार व गुणवक्तापूर्ण शिक्षण घेत आहेत.”अशी माहिती देण्यात आली.
ज्या मातृसंस्थेने विद्यार्थ्याना घडविले त्या मातृसंस्थेशी असणारे ऋणानुबंध अधिक वृध्दिंगत करण्यासाठी व शाळेतील आठवणींना उजाळा देण्यासाठी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सचिन जरग व सर्व पदाधिका यांनी हा माजी विद्यार्थ्या"चा महास्नेह मेळावा आयोजित केल्याचे संयोजकांनी सांगितले. याप्रसंगी धनाजी जाधव, चंदु ओसवाल, सुर्यकांत सोनुले, रवी वावडेकर, मंगेश गुरव यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. आर. सत्रे यांनी केले.