रोटरीचे व्यावसायिक गुणवत्ता- गौरव पुरस्कार प्रदान उत्साहात
schedule21 May 23 person by visibility 390 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्सतर्फे २०२३ या वर्षासाठीचे ‘व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार’ (व्होकेशनल एक्सलेन्स अवॉर्ड ) व रोटरी गौरव पुरस्कार समारंभ नुकताच झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सहाय्यक प्रांतपाल रो सुजाता लोहिया व प्रांतपालांचे विशेष प्रतिनिधी रो वारणा वडगावकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.रोटरी व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार विजेत्यामध्ये डॉ लता पाटील (शैक्षणिक क्षेत्र), अनिता काळे ( सामाजिक कार्य), मंगला जाधव ( घरगुती काम), शिवाजी आळवणे ( शेतकरी), सौम्या तिरोडकर( विमा सल्लागार ), डॉ शशिकांत कुंभार (आयुर्वेदाचार्य), डॉ. सुषमा सिद ( आयुर्वेदाचार्य) , अजम जमादार ( मंडप व्यवसाय), औकार नवळीहळकर ( आपत्ती व्यवस्थापन), चिदंबर शिंदे ( ग्राफिक डिझाईनर), डॉ मनाली बाफना ( ॲलोपॅथी डॉक्टर ), दिपक बिडकर ( नृत्य विशारद), अभिलाषा नाईक ( व्यवसायिक शिक्षण) यांचा समावेश आहे.
रोटरी गौरव पुरस्कार वेदिका जाधव ( स्पोर्टस), श्रेया देसाई (मुलांचा लैंगिक छळ विरोधी संघटना ' सक्षम'), दिपक जाधव (सामाजिक कार्य) यांना तर नेशन बिल्डर अवॉर्ड व्दारकानाथ भोसले (विद्यामंदिर हुपरी), सुजाता पाटील ( प्रबुद्ध भारत हायस्कूल) व अशोक चौगुले ( न्यू कॉलेज) यांना वितरित करण्यात आले. मनोज गुणे, विनय कौलवकर, पंकज इंगळे, गार्गी दाभाडे, सोनाली चिपाडे व तत्त्व लुनिया यांना फ्रेंड ऑफ रोटरी पुरस्कार देण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर रॉयल्सच्या अध्यक्षा रो सविता पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. खजाननीस रो मनीषा राठोड यांनी आभार मानले. कॅनीस नोरेन्ज यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी प्रिया बासरानी, जया शिंदे, प्रेमा चौगले, स्मिता सावंत मांडरे, विद्या साळोखे,. सुषमा धर्माधिकारी उपस्थित होते.