बालिंगा उपसा केंद्रातील कर्मचाऱ्यांचा आमदारांच्याकडून सन्मान
schedule08 Nov 23 person by visibility 266 categoryमहानगरपालिका

आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून मिठाई व पेहराव
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बालिंगा उपसा केंद्रातील चेंबर आणि दगडी पाटाचे काम सुरू आहे. आमदार ऋतुराज पाटील यानी बुधवारी या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. स्वतःचा जीव धोक्यात घालून जोखमीचे काम करणाऱ्या सर्व ३० कर्मचाऱ्यांचे कौतुक करत आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांना दिवाळीची भेट म्हणून पेहराव आणि मिठाई दिली. ऐन सणासुदीच्या काळात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा म्हणून केलेले काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यानी काढले.
जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, कॉन्ट्रॅक्टर मिलिंद कणसे, भोसले यारी ग्रुपचे रुपेश भोसले यांनी या कामाच्या पूर्ततेसाठी अहोरात्र प्रयत्न करून कष्ट घेतल्याबद्दल त्यांचाही सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली. फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवरही त्यांनी कौतुकाची थाप दिली. ऐन सणासुदीच्या काळात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा म्हणून केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. गुरुवारपासून कोल्हापूर शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होईल, अशी आशा आमदार पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, राहुल माने, प्रकाश गवंडी, विनायक फाळके, मधुकर रामाणे, दुर्वास कदम यांच्यासह दिग्विजय मगदूम, मयूर पाटील, इजाज नागरगट्टी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.