वारे वसाहतीतील युवकाच्या खून प्रकरणातील आठ जणांना अटक
schedule15 Jun 24 person by visibility 252 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर: टिंबर मार्केट परिसरात झालेल्या सुजल बाबासो कांबळे (रा. वारे वसाहत) याच्या खून प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी आठ संशयीतांना अटक केली आहे. कोर्टाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. मयत सुजलचा चुलता अजय किरण कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. पूर्ववैमणन्यसातून आणि सोशल मीडियावर रिल्स तयार करून एकमेकांना गटांना आव्हान देऊन खुन्नस वाढल्याने गुरुवारी दुपारी टिंबर मार्केट रोडवर सुजल कांबळे याचा आठ ते नऊ युवकांनी पाठलाग करून सुजला निर्घुण खून केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी बारा तासांमध्ये या गुन्ह्यातील आठ संशयतांना जेरबंद केले. ओमकार राजेंद्र पोवार (वय १९ पंचगंगा तालीम मंडळ परिसर) आदित्य आनंदा पाटील उर्फ जर्मनी (२१ रा. झुंजार क्लब शिवाजी पेठ), आशिष भाटकर व(१९रा. पंचगंगा तालीम परिसर, उत्तरेश्वर पेठ), तेजस उर्फ पार्थ राजेंद्र कळके (१९, मस्कुती तलाव परिसर उत्तरेश्वर पेठ), श्रवण बाबासो नाईक (१९ सरनाईक कॉलनी शिवाजी पेठ) सादिक जॉन पीटर (१९ राजाराम चौक,टिंबर मार्केट)कोहिनूर शोएब शेख, सुमित कांबळे यांच्यासह विधी संघर्ष बालकाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी आठ संशयीतांना अटक केली आहे. शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजयकुमार झाडे, यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव ,संजय पडवळ, समीर कांबळे, अमित मर्दाने, दीपक घोरपडे, विनोद कांबळे, वैभव पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयितांना अटक केली.