Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कामगार- कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक,  सरकारच्या चार श्रमसंहितेला जोरदार विरोधकोल्हापुरात आयुष विद्यापीठ स्थापण्यासाठी प्रयत्नशील-सहपालकमंत्री माधुरी मिसाळविट्यात २२ फेब्रुवारीला ४४ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनकास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची प्रशासनासोबत चर्चाशिवाजी विद्यापीठात शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषदशाहू महाराज हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहातसांगलीत सोळा फेब्रुवारीपासून राज्य कला प्रदर्शन, १२७५ कलाकृतींचे प्रदर्शनकोल्हापुरात रंगणार पुजाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा, विविध जिल्ह्यातील बारा संघांचा सहभागप्रा. डॉ. जे. बी. शिंदे यांचे निधन विवेक सिद्ध यांना जीवन प्रकाश समाज गौरव पुरस्कार

जाहिरात

 

कोल्हापुरात आयुष विद्यापीठ स्थापण्यासाठी प्रयत्नशील-सहपालकमंत्री माधुरी मिसाळ

schedule13 Feb 26 person by visibility 11 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘संपूर्ण देशभरात मिळून तीन आयुष विद्यापीठांची स्थापना करण्यात येणार आहे. त्यापैकी एक आयुष विद्यापीठ कोल्हापूर परिसरात स्थापन व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे.’असे सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

नागाळा पार्क येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अर्थसंकल्पातील महत्वाच्या योजनांची माहिती दिली. केंद्रीय अर्थसंकल्पातून यंदा महाराष्ट्राला ९८ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. हा निधी गेल्यावर्षीपेक्षा १५ हजार कोटी अधिक आहे. अर्थसंकल्पातील अनेक तरतुदी या कोल्हापूर व इचलकरंजीसाठी लाभदायक आहेत. वस्त्रोद्योग, चर्मोद्योगच्या योजनांचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या शहराला गती देण्यासठी शहर आर्थिक विकास क्षेत्र ही योजना सुरू केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, नाशिक या शहरांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत संबंधित शहरांना पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी जादा निधी मिळणार आहे. कोल्हापूरचाही शहर आर्थिक विकास क्षेत्रमध्ये समाविष्ठ व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापुरात भाविक व पर्यटकांचा ओघ वाढत आहे. त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यावर भर आहे. त्या अंतर्गत स्वच्छतागृहांची संख्या वाढविली जाईल.’असेही त्या म्हणाल्या. आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, महापालिकेतील गटनेते मुरलीधर जाधव, नगरसेवक विजय खाडे, विराज चिखलीकर आदी उपस्थित होते.

 

 

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes