विट्यात २२ फेब्रुवारीला ४४ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
schedule12 Feb 26 person by visibility 30 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील विटा,येथे २२ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतमाता ज्ञानपीठ आयोजित ४४ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे साहित्य संमेलन राधा रामकृष्ण बापट मुक्तांगण वाचनालयाच्या प्रांगणात होणार आहे. साहित्यिक आसाराम लोमटे हे संमेलनाध्यक्ष आहेत, अशी माहिती संयोजक रघुराज मेटकरी यांनी दिली.
उद्योजक प्रसाद गायकवाड यांच्या हस्ते सकाळी ९.३० वाजात सरस्वती पूजन करून संमेलनाची सुरुवात होणार आहे. कवी पुरुषोत्तम सदाफुले - पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन होणार आहे. त्यामध्ये अनेक कवी सहभागी होणार आहेत. दुसरे सत्र दुपारी चार वाजता सुरू होणार आहे. त्याचे उद्घाटन साहित्यिक शरद तांदळे करणार आहेत. दौलत शितोळे हे प्रमुख पाहुणे आहेत. स्वागताध्यक्ष आमदार सुहास बाबर आहेत. तिसऱ्या सत्रात रात्री ८.३० वाजता कथाकथन व संमेलन समारोप आहे. प्रमुख पाहुणे महेश (दाजी )कदम नगरसेवक विटा नगरपरिषद विटा असून प्रा. रवींद्र कोकरे प्रा. विश्वनाथ गायकवाड, यांचे कथाकथन आहे.
प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री पु. ल. देशपांडे यांच्या नावाने उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार सुवर्णा धनंजय चव्हाण- गुंड व आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. डॉ. सुवर्णा हजारे- डांगे व प्रा. डॉ.विठ्ठल हरिभाऊ जंबाले यांना व ज्ञानोबा बापू काळे उत्कृष्ट वांड्मय निर्मिती पुरस्कार प्रा.डॉ. किसन माने यांना व हौसाबाई ज्ञानोबा काळे उत्कृष्ट वाड्मय निर्मिती पुरस्कार युवराज कल्लाप्पा पाटील यांना देण्यात येणार आहे.साहित्यिका शकुंतला होनमाने यांच्या 'शकुंतलाच्या काव्य सरिता' कवितासंग्रहाचे प्रकाशन व साहित्यिक रघुराज मेटकरी यांचे 'महाप्रतापी सुभेदार मल्हारराव होळकर' या पुस्तकाचे प्रकाशक यावेळी होणार आहे.डॉ. ऋषिकेश मेटकरी, वैशाली कोळेकर, अरुण लंगोटे , हर्षवर्धन मेटकरी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी योगदान देत आहेत. नवोदित कवींनी व रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.