अंबाबाई मंदिर-जोतिबा मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड ! तोकडे कपड्यास मनाई !!
schedule13 May 25 person by visibility 39 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर व वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यासंबंधीचा निर्णय मंगळवारी 13 मे रोजी जाहीर केला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात यासंबंधीची माहिती दिली आहे. भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी व धार्मिक पिढीसाठी येताना तोकडे कपडे परिधान करू नयेत. पारंपारिक पद्धतीने कपडे परिधान करावेत असे म्हटले आहे. मंदिरामध्ये धार्मिकतेचा आदर करून महिला व पुरुष भाविकांनी पारंपारिक पद्धतीने कपडे परिधान करावेत. असे म्हटले आहे.