दहावी परीक्षेत कोल्हापूर विभागात 1114 शाळांचा निकाल शंभर टक्के ! जिल्ह्यातील 500 शाळा शंभर नंबरी!!
schedule13 May 25 person by visibility 126 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी - मार्च २०२५ मध्ये झालेल्या दहावी
परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल 96.87 टक्के लागला. कोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय स्थानावर आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत गुणांचा वर्षाव झाला आहे. कोल्हापुरी विभागातील 1114 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 500 शाळा, सातारा जिल्ह्यातील 357 तर सांगली जिल्ह्यातील 257 शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. दुसरीकडे कोकण विभाग 98. 82 टक्के गुणासह अव्वल स्थानी आहे. दरम्यान कोल्हापूर विभागातंर्गत कोल्हापूर जिल्हयाचा
निकाल 97. 52 टक्के, सांगली जिल्हयाचा निकाल 96.09 टक्के तर सातारा जिल्हयाचा निकाल 96.75 टक्के लागला आहे. गेल्या दहा वर्षात 2021 चा अपवाद वगळता कोल्हापूर विभाग राज्यामध्ये द्वितीय स्थान राखण्यात यशस्वी ठरले आहे. तर गतवर्षीच्या निकालाच्या तुलनेत यंदा 0.58 टक्के कमी निकाल लागला आहे. गेल्या वर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल 97.45 टक्के होता.
कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील 2327 शाळेतील एक लाख 29 हजार 421 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी उत्तीर्ण
विद्यार्थ्यांची संख्या एक लाख 25 हजार 380 इतकी आहे. दहावीचा निकाल मंगळवारी (८ मे २०२५) ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला. कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत निकाल घोषित केला. यंदाच्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील 53 हजार हजार 726 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 52 हजार 394 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सांगली जिल्ह्यातील 38 हजार 492 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 36 हजार 989 इतकी आहे. तर सातारा जिल्ह्यात 37 हजार 203 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये 35 हजार 997 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या परीक्षेत प्रत्यक्ष कॉपी करत असताना एकही केस आढळले नाही. परीक्षा दरम्यान एकही गैरप्रकार घडला नाही. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडली. असे मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी सांगितले. यंदापासून विद्यार्थ्यांना गुणपत्रक डिजीलॉकर मध्ये देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे असेही ते म्हणाले. निकालाचे वैशिष्ट्य सांगताना चौगुले म्हणाले यंदा कोल्हापूर विभागात 75 टक्के हून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 46 हजार 761 इतकी आहे तर 60 ते 75 टक्के दरम्यान गुण प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या 44 हजार 155 आहे. 55 ते 60 टक्के या दरम्यान गुण प्राप्त केलेले विद्यार्थी 27,140 इतके आहेत.
परीक्षेत पस्तीस टक्के ते 55 टक्के या दरम्यान गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 7324 इतकी आहे. कोल्हापूर विभागात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 98.19 इतकी असून मुलांच्या उतरतेची टक्केवारी 95.74 टक्के इतकी आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलापेक्षा 2.45 टक्के इतकी जास्त आहे. पत्रकार परिषदेला मंडळाचे सहसचिव बीएम केले जात एस वाय दुधगावकर एच के शिंदे जे एस गोंधळी एसपी नलवडे आर एल इनामदार आर आर देसाई आदी उपस्थित होते.