दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी डॉ.विलास कारजिन्नी, डॉ. सौरभ बोरचाटेंना निमंत्रण
schedule21 Oct 25 person by visibility 331 categoryशैक्षणिकगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी आणि तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालय, येथील सीएसबीएस व सायबरसिक्युरिटी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सौरभ बोरचाटे यांना दक्षिण कोरियातील प्रतिष्ठित चुंगनाम नॅशनल युनिव्हर्सिटी (सीएनयू), डेझॉन येथे आयोजित ‘२०२५ इंटरनॅशनल वर्कशॉप ऑन इंजिनिअरिंग विथ डिस्टींग्विश्ड स्कॉलर्स फ्रॉम एशियन कंट्रीज’ या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी सादर निमंत्रण प्राप्त झाले आहे. वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी त्यांना आंतरराष्ट्रीय सहभागासाठी शुभेच्छा दिल्या. ही कार्यशाळा २० ते २५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत होणार असून, आशियातील विविध देशांतील नामांकित विद्वान व संशोधक यात सहभागी होऊन अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधन, नवकल्पना आणि तांत्रिक प्रगतीविषयी विचारमंथन करतील.या कार्यशाळेच्या निमित्ताने डॉ. कारजिन्नी आणि डॉ. बोरचाटे हे दक्षिण कोरियातील विविध अग्रगण्य विद्यापीठांना शैक्षणिक सहकार्य आणि संशोधन देवाणघेवाणीसाठी भेट देणार आहेत. ते दक्षिण कोरियन विद्यापीठांना भेट देऊन शैक्षणिक सहकार्य, विद्यार्थी देवाणघेवाण आणि संशोधन क्षेत्रातील नव्या संधींवर चर्चा करणार आहेत