डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिटयूटकडून स्वच्छतेचा संदेश
schedule01 Oct 23 person by visibility 406 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीरिंग अँड टेक्नॉलॉजी मार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छताविषयक जनजागृती करण्यात आली.
नागाळा पार्क येथील नागोबा मंदिर परिसराची निवड करण्यात आली. गांधी जयंतीचे औचित्य साधून संस्थेच्या एन एन एस विभाग व ग्रीन क्लबमार्फत रविवारी, एक ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियान झाले. या उपक्रमामध्ये संस्थेतील १०० हून अधिक विद्यार्थी व संस्थेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. अभियानाची सुरुवात स्वच्छता शपथ घेऊन करण्यात आली.
या उपक्रमासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे व कॊल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभाग यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
इन्स्टिटयूटच्या वतीने यापुढेही अशा प्रकारचे विविध सामाजिक, पर्यावरणपूरक व समाज प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार असल्यचे प्राचार्य वीरेन भिर्डी यांनी सांगितले. विभागप्रमुख श्री. प्रवीण भट, प्रा. सुप्रिया मेंगाणे व प्रबंधक अमित आवाड यांनी परिश्रम घेतले.