+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर adjustचेतन नरके गटाचा शाहू छत्रपतींना पाठिंबा ! विरोधकांना जाहीरपणे तराटणी!! adjustसदाशिवराव मंडलिकांचे पांग फेडण्याची हीच योग्य वेळ-हसन मुश्रीफ adjustशिक्षक भारती संघटनेच्या उपाध्यक्षपदी काकासाहेब भोकरे
1000255522
Screenshot_20240226_195247~2
schedule14 Apr 24 person by visibility 93 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) ताराबाई पार्क कार्यालय येथे  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्या हस्ते आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
 चेअरमन डोंगळे म्हणाले,  ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व असाधारण होते. विद्वान, शिक्षाविद्या, कायदेपंडीत, समाजसुधारक असलेल्या डॉ.आंबेडकराचे जीवन हे साहस आणि दृढ विश्वासाचा एक प्रेरणादायी मार्ग असून त्यांनी “दलित, वंचित वर्ग, शेतकरी, श्रमिक आणि विशेषतः महिला यांना समान अधिकार, सन्मान मिळवून देणाऱ्या समाजाचे स्वप्न डॉ. आंबेडकर यांनी पाहिले होते, त्यांनी समाजाला दाखवलेला मार्ग करुणा, समानता या भावना दृढ करणारा होता.
 संचालक डॉ.सुजित मिणचेकर म्हणाले कि, भारतामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले या महापुरुषांपैकी एक अलौकिक तेजस्वी व्यक्तिमत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. सविंधानामध्ये कष्टकरी कामगारांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला पगार व बोनस स्वरुपात मिळून देणारे कायदे करण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले.’
 याप्रसंगी संचालक  शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, मुरलीधर जाधव, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंखे, संकलन व्‍यवस्‍थापक एस. व्ही. तुरंबेकर, दत्तात्रय वाघरे,बी.आर.पाटील, डॉ.दयावर्धन कामत, डॉ.किटे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, अशोक पुणेकर, विनोद वानखेडे  उपस्थित होते.