दाखल्यांसाठी सामान्यांची परवड नकाे, त्वरित दाखले द्या : विजय जाधव
schedule22 Jun 24 person by visibility 331 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सरकारी दाखले मिळण्यासाठी सर्वसामान्यांची होणारी परवड थांबवा आणि त्वरित दाखले द्या अशीं मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडे केली.
भाजप जिल्हाध्यक्ष् विजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.जाधव म्हणाले, ‘
जून महिना म्हणजे शैक्षणिक वर्षाची सुरुवात या कालावधीत पहिलीपासून ते उच्च शिक्षणाच्या संदर्भात पालकांना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले, रहिवासी दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमीलीयर, उत्पन्न दाखले इत्यादी दाखल्यांची आवश्यकता लागते. या दाखल्यांच्या आधारेच पुढील शैक्षणिक प्रकिया अवलंबून असते. परंतु हे दाखले मिळण्यासाठी सरकारी कार्यालय, महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना फेऱ्या घालाव्या लागत असल्याचे चित्र आहे. सामान्यांना त्रास होणार नाही यासाठी यंत्रणा गतीमान करावी.’
निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी लवकरच शहरात विविध ठिकाणी कॅम्प घेण्यात येईल असे आश्वस्त केले. याप्रसंगी रविकिरण गवळी, अप्पा लाड, विशाल शिराळकर, रुपारानी निकम, राजू मोरे, अवधूत भाट्ये, सयाजी आळवेकर, दिलीप बोंद्रे, अशोक लोहार, जय गवळी, योगेश साळोखे उपस्थित होते.