+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustपीएसबी ज्वेलर्सतर्फे ग्राहकांसाठी खुशखबर ! दसरा-दिवाळीला सोने-चांदी खरेदीवर भेट वस्तू !! adjustकोल्हापूर-मुंबई विमानसेवेचे उडान adjust महावीर कॉलेजमध्ये शुक्रवारी कोल्हापूर विभागीय युवक महोत्सव adjustअंबाबाई देवीची विश्वेश्वरी जगद्धात्री रुपात पूजा adjustडीवाय पाटील सहकारी बँकेस ‘उत्कृष्ट बँक’ पुरस्कार adjustफ्युच्युरिस्टीक क्लासरुममध्ये रमले आमदार-माजी आमदार अन् अधिकारी adjustप्राचार्य सुनीलकुमार लवटे यांचा रविवारी नागरी सत्कार, नऊ ग्रंथांचे प्रकाशन adjustबंगाली समाजाच्यावतीने दैवज्ञ बोर्डिंगमध्ये दुर्गादेवीची स्थापना adjustजिल्हा परिषद सोसायटीतर्फे सभासदांसाठी कोअर बँकिग प्रणाली, मोबाइल अप कार्यान्वित adjustगोकुळतर्फे सव्वा लाख रुपये बक्षिसांची झिम्मा-फुगडी स्पर्धा
Screenshot_20220924_150302
Screenshot_20220911_122758
Screenshot_20220906_162944
Maharashtra-News-1IMG-20200920-WA0002
schedule20 Sep 22 person by visibility 132 categoryक्रीडा
तेरा वर्षाखालील  जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा,  र्दिशा पाटील व अथर्व तावरे उपविजेते
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
      कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व केन चेस अकँडमीतर्फे  लायन्स क्लब इचलकरंजी यांच्या सहकार्याने आयोजित तेरा वयोगट जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत जांभळीच्या अभय भोसलेने आठ पैकी आठ गुणासह अजिंक्यपद पटकाविले तर इचलकरंजी चा अथर्व तावरे सात गुणासह उपविजेता ठरला. बुध्दिबळ स्पर्धेला दाते मळा, लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी सभागृहात झाली.
या स्पर्धेला कोल्हापूर जिल्हयातील कोल्हापूर, गडहिंग्लज, जयसिंगपूर, वडगाव, इचलकरंजी आदि शहरातील 13 वर्षाखालील गटात 84 मुले , 27 मुली असे 111 खेळाडू सहभागी झाले होते.
  13 वर्षाखालील मुलांच्या गटात जांभळीच्या अभय भोसलेने आठ पैकी आठ गुणासह अजिंक्यपद पटकाविले तर इचलकरंजी चा अथर्व तावरे सात गुणासह उपविजेता ठरला. 3)विवान सोनी (इचलकरंजी), ४)वेंकटेश खाडे-पाटील (कोल्हापूर) ५)हीत बल्दवा (जयसिंगपूर) या मानांकित खेळाडूचा अनुक्रमे 3 ते 5 नंबर आला. , सहावा क्रमांक स्वरूप साळवे (गडहिंग्लज) . मुलीमध्ये अग्रमानांकित जयसिंगपूर ची दिव्या पाटील विजेती ठरली तर तिची जुळी बहीण दिशा पाटीलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तृतीय क्र.संस्कृती सुतार (नांदणी), चतुर्थ क्र.प्रियदर्शनी ठोमके (इचलकरंजी) , पाचवा महिमा शिर्के (कोल्हापूर) सहावी स्वरा सागावंकर (इचलकरंजी) या खेळाडूंनी नंबर मिळवला .
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ लायन्स क्लब चे कृष्णा भराडिया लक्ष्मीकांत भट्टड, केनचे प्रोप्रायटर श्री. निकुंज बगडीया, कोल्हापूर जिल्हा बुध्दिबळ असो. चे आंतरराष्ट्रीय पंच श्री. भरत चौगुले , ला.कुमार भंडारी व नवीन जैन, ला.शैलेंद्र जैन लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी .अध्यक्ष ला. महेंद्र बालार, सचिव ला. सुभाष तोषनिवाल. खजिनदार ला. संदीप सुतार.लेडीजविंग चेअरपर्सन ला.कनकश्री भट्टड उपस्थित होते. प्रास्ताविक, परिचय श्री. रोहित पोळ यांनी केले.यांनी सर्वांचे आभार मानले.
 *उत्तेजनार्थ* *सात वर्षाखालील उत्कृष्ट*:- रौनक झंवर (इचलकरंजी), दिविज कातृट (कोल्हापूर), नक्ष डांगरे (इचलकरंजी) , *नऊ वर्षाखालील उत्कृष्ट*:- रिय्यार्थ पोदार (इचलकरंजी),शौर्य बगडिया (इचलकरंजी), अर्णव पाटील (कोल्हापूर) ,*अकरा वर्षाखालील उत्कृष्ट*- वेदांत पुजारी (कोल्हापूर), राजदीप पाटील (कोल्हापूर), सर्वेश पोतदार (कोल्हापूर) मुली मध्ये उत्तेजनार्थ.*सात वर्षाखालील उत्कृष्ट*:- सोनी अन्वेशा (इचलकरंजी), चौधरी सांची , प्रगती बंग सर्व इचलकरंजी.*नऊ वर्षाखालील उत्कृष्ट*.:-सिध्दी कर्वे, पहल मुंदडा, धनश्री पोरलेकर सर्व इचलकरंजी *अकरा वर्षाखालील उत्कृष्ट*:- शिंदे शर्वरी, अनिका खंडेलवाल, समर्था नलवडे.इचलकरंजी वरील उत्तेजनार्थ खेळाडूंना मेडल देवुन गौरविले.
या स्पर्धेचे पंच म्हणून मुख्य पंच करण परिट , रोहित पोळ,शंकर आडम, सुमित कांबळे,सौ. अस्मिता नलवडे , तर सहाय्यक म्हणून सम्मेद पाटील , ला.कृष्णा भराडिया यांनी काम पाहिले.
 या स्पर्धेतून तेरा वर्षाखालील राज्यस्तरीय मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा निवडण्यात आलेला संघ पुढीलप्रमाणे
मुले:-अभय भोसले (जांभळी) व अथर्व तावरे (इचलकरंजी) 
मुली:- दिव्या पाटील (जयसिंगपूर) व दिशा पाटील (जयसिंगपूर)
तेरा वर्षाखालील महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा दोन ते चार ऑक्टोंबर दरम्यान नागपूर येथे होणार आहेत.