पीएम वाणी वायफाय योजनेचा जिल्हयात प्रारंभ, दिवसाला फक्त पाच रुपयात अनलिमिटेड डाटा
schedule22 May 23 person by visibility 343 categoryउद्योग

खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गोरगरीब जनतेला स्वस्तात इंटरनेट सुविधा मिळावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सरकारमान्य इंटरनेट सेवा योजना सुरू केलीय. दिवसाला फक्त पाच रुपयांमध्ये अनलिमिटेड मोबाईल डाटा उपलब्ध होणार आहे,याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. हातकणंगले येथे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या पीएम वाणी वायफाय योजनेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
खासदार महाडिक म्हणाले," सार्वजनिक ठिकाणी लोकांना परवडणार्या दरात वायफाय तसंच इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणं, ग्रामीण भागात जिथे इंटरनेट सुविधा मिळत नाही, अशा ठिकाणी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणं, रेशन दुकानापासून शंभर ते तीनशे मीटर परिसरातील नागरिकांना वायफाय देणं, अत्यंत कमी उत्पन्न असणार्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणं, यासाठी पीएम वाणी योजनेच्या माध्यमातून वायफाय मिळणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले, दुकान जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, पीएम वाणीचे जयेश गाणेकर, राजेंद्र कारंडे, महेश ठोंबरे, यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी नगरसेवक राजू इंगवले, मयूर कोळी, दीनानाथ मोरे, उमेश सूर्यवंशी, सुभाष मोरे, पांडुरंग सुभेदार, महादेव कदम, रावसाहेब कारंडे, आनंदा हजारे,विठ्ठल कारके आबू बारगीर उपस्थित होते.