मराठा महासंघाकडून शाहू महाराजांच्या छायाचित्रांचे वाटप
schedule06 May 23 person by visibility 218 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
नर्सरी बाग येथे राजर्षी शाहू स्मृती शताब्दीपूर्ती अभिवादन प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने राजर्षी शाहू महाराजांच्या एक हजार रंगीत छायाचित्रांचे वाटप करण्यात आले.
राजर्षी शाहू महाराजांना नर्सरी बागेत अभिवादन केल्यानंतर
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री नाम.दिपक केसरकर, तंत्र शिक्षण मंत्री नाम. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या हस्ते छायाचित्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी वसंतराव मुळीक यांनी शाहू स्मृती शताब्दी वर्षामध्ये एक लाखापेक्षा जास्त प्रतीचे वाटप करण्यात आले असून भावी काळात १० लाख प्रती देशभर वितरण करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. समितीच्या वतीने राजर्षी शाहू महाराज शाहु महाराज यांची प्रतिमा घरोघरी लागण्यासाठी प्रयत्न करत आहेत.याप्रसंगी समितीचे उपाध्यक्ष बबनराव रानगे, अनंत म्हाळुंगेकर, दिलीप पोवार, हसन देसाई, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, कादर मकबारी, संजय कांबळे, उदय देसाई, डी जी भास्कर सुशिल कोल्हटकर, अमरसिंह रजपूत सुनील कानूरकर, बाबुराव बोडके, महेश मचले, मनोज नरके, शैलजा भोसले, दिपा डोणे, संयोगीता देसाई, नीलम मोरे, बबिता जाधव, दत्ता वारके, विजयसिंह पाटील, अशोक भांडार, दिलीप देसाई, अशोक माळी आदी उपस्थित होते.