कोकण रेल्वे सल्लागार समितीच्या संचालकपदी ललित गांधी, आशिष पेडणेकर
schedule13 May 23 person by visibility 198 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडच्या रेल्वे सल्लागार समितीच्या संचालकपदी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी आणि विश्वस्त आशिष पेडणेकर यांची निवड झाली आहे. गांधी यांच्या कार्याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने ही निवड केली आहे. या निवडीचा कालावधी ३१ जानेवारी २०२५ पर्यंत आहे. कोकण रेल्वेचे सचिव एन.एम.तेलंग यांनी गांधी व पेडणेकर यांना निवडीचे पत्र दिले आहे. या समितीत चार राज्यांतून राज्यसभा आणि लोकसभेच्या प्रत्येकी दोन खासदारांचा समावेश आहे.