+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहाराष्ट्रद्रोह्यांचा सुफडासाफ करा, चोरा मी वंदिले ही भाजपची परंपरा ! उद्धव ठाकरेंचा घणाघात adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर adjustचेतन नरके गटाचा शाहू छत्रपतींना पाठिंबा ! विरोधकांना जाहीरपणे तराटणी!! adjustसदाशिवराव मंडलिकांचे पांग फेडण्याची हीच योग्य वेळ-हसन मुश्रीफ
1000255522
Screenshot_20240226_195247~2
schedule16 Mar 24 person by visibility 1081 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे (गोकुळ) जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांना व्यवस्थापन खर्चासाठी  प्रतिलिटर दहा पैसे व संस्था सचिवांना पाच पैसे वाढीचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. येत्या एक एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल.’ अशी घोषणा चेअरमन अरुण डोंगळे यांनी केली.
गोकुळच्या हिरकमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त जिल्हास्तरीयव तालुकास्तरीय नंबर आलेल्या प्राथमिक दूध संस्थांचा सत्कार, दूध व दुग्धजन्य वितरक पुस्कार सोहळा झाला. याप्रसंगी महालक्ष्मी कोहिनूर डायमंड आणि टीएमआर मॅश व अॅटो सॅम्पलिंग मशिनचे उद्घाटनही झाले. कळंबा येथील अमृतसिद्धी मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमाला दूध उत्पादकांनी मोठी गर्दी केली होती. गोकुळचा ६१ वा वर्धापनदिन केक कापून साजरा करण्यात आला.याप्रसंगी दूध उत्पादकांतर्फे चेअरमन डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
गोकुळ दूध संघास जास्तीत जास्त दूध पुरवठा करणारी दूध संस्था म्हणून करवीर तालुक्यातील वडकशिवाले येथील श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.या समारंभात साऱ्यांनीच सहकारमहर्षी आनंदराव पाटील चुयेकर व एन. टी. सरनाईक यांच्या योगदानाचा गौरवोल्लेख केला. याप्रसंगी बोलताना चेअरमन डोंगळे यांनी गोकुळच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेची वाटचाल कष्टातून झाली आहे.’असे निदर्शनास आणून देत संस्थेच्या कामगिरीतील महत्वाचे टप्पे उलगडले. ‘उच्च प्रतीचे दूध आणि दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ यामुळे गोकुळ म्हणजे क्वॉलिटी असे समीकरण तयार झाले. दूध उत्पादकांची मेहनत, प्राथमिक दूध संस्थाचे सहकार्य आणि संचालक मंडळाच्या सभासदाभिमुख कारभाराचे ते फलित आहे. राज्य सरकारकडून महानंद हा दूध संघ गोकुळने चालविण्यास घ्यावा अशी विचारणा झाली होती. महानंदची कर्मचारी संख्या व इतर बाबींमुळे गोकुळने त्यासंबंधी तयारी दर्शविली नाही. मात्र जिल्हास्तरावरील दूध संघाकडे या पद्धतीची विचारणा करणे हा खरं तर गोकुळचा सन्मान आहे. हिरकमहोत्सवी वर्ष सांगता समारंभानिमित्त प्राथमिक दूध संस्थांना दिल्या जाणाऱ्या  व्यवस्थापन खर्चासाठी प्रतिलिटर दहा पैसे व सचिवांसाठी पाच पैशाची वाढ करण्यात येत आहे. यामुळे गोकुळला दरवर्षी दहा कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.’असेही चेअरमन डोंगळे यांनी नमूद केले.
संचालक विश्वास पाटील म्हणाले, ‘सहा दशकाच्या कालावधीत गोकुळने मोठी झेप घेतली. आज संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. संस्थेच्या लौकिक वाढीत सगळया घटकांचा सहभाग आहे.’ कार्यक्रमाला संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, बाळासाहेब खाडे, एस. आर. पाटील, अभिजित तायशेटे, अमर पाटील, बयाजी शेळके, अंजना रेडेकर, प्रकाश पाटील, करणसिंह गायकवाड, प्रा. किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, अंजना रेडेकर, कुंभीचे व्हाईस चेअरमन विश्वास पाटील, गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिेग अधिकारी हणमंत पाटील आदी उपस्थित होते. अधिकारी एम. पी. पाटील-कावणेकर यांनी सूत्रसंचालन केले.
………………..
अमृतसिद्धी हॉलच्या जागेत गोकुळच्या कामकाजाचा प्रारंभ
संचालक अजित नरके यांनी, ‘गोकुळची सुरुवात ही अमृतसिद्धी हॉलच्या जागेत झाली. प्रारंभी कोल्हापूर मिल्क अँड मिल्क प्रोसेसर्स असे नाव होते. पुढे जिल्हा दूध उत्पादक संघ असे नामकरण झाले. ही मूळ जागा एन. टी. सरनाईक यांची. त्यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर आनंदराव पाटील चुयेकर यांनी या ठिकाणाहून दूध संघाच्या कामकाजाला सुरुवात केली. १९९८ च्या दरम्यान या जागेवर अमृतसिद्धी कार्यालय बांधले. कार्यालयाच्या उद्घाटन सोहळयात चुयेकर यांनी श्रीकृष्णाची मूर्ती भेट दिली होती. दूध संघाच्या कामकाजाला ज्या ठिकाणाहून सुरुवात झाली त्याच परिसरात गोकुळचा हिरकमहोत्सवी सांगता समारंभ होत आहे. याचे वेगळे समाधान आहे.’