Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा महत्वाच्या : पोलिस अधिकारी प्रिया पाटीलडेप्युटी सीईओ अरुण जाधव निलंबित, कोल्हापुरातील कामकाजावरुन कारवाईडिबेंचर कपातीच्या विरोधात 16 ऑक्टोबरला जनावरासहित गोकुळवर मोर्चागोकुळ कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस मदतस्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूरमध्ये सोळा ऑक्टोबरला ऊस परिषदश्रुती सुनील कुलकर्णी यांचे निधनगंगावेस येथील बाजारपेठेत ओमनी कार घुसली ! भाजी विक्रेती महिला ठार, दोघी जखमी !!अक्षयकुमारची कोटीची मदत, केडीएमजीचा पुढाकार ! कुरुंदवाडला उभारणार कन्या शाळा !!वांगचूक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरात मोर्चा, भाजप सरकारविरोधात घोषणाबाजीराज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धेचा समारोप दिमाखात

जाहिरात

 

डेप्युटी सीईओ अरुण जाधव निलंबित, कोल्हापुरातील कामकाजावरुन कारवाई

schedule14 Oct 25 person by visibility 1908 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले अरुण जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव सुभाष इंगळे यांनी निलंबनाचा आदेश काढला आहे. जाधव यांची जुलै २०२५ मध्ये कुडाळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी बदली झाली होती. सध्या ते सिंधुदर्ग जिल्हा परिषद येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदावर आहेत. दरम्यान जाधव यांच्या कोल्हापुरातील कामकाजाबद्दल गर्जन संघटनेच्या प्रकाश बेलवडे यांनी तक्रार केली होती. निलंबन कालावधीत जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्यालय सोडता येणार नाही असे आदेशात म्हटले आहे. ग्रामविकास विभागाचे उपसचिव सुभाष इंगळे यांच्या सहीनिशी निलंबनाचा आदेश निघाला आहे.

जाधव  हे कोल्हापूर जिल्हा परिषदेत १६ ऑगस्ट २०२० ते पंधरा जुलै २०२५ या दरम्यान उपमुख्य कार्यकारी होते. जाधव यांच्याकडून २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जनसुविधा, नागरी सुविधा व क वर्ग तीर्थक्षेत्र यात्रास्थळ योजनेच्या कामामध्ये दीडपटपेक्षा अधिक रकमेच्या प्रशासकीय मान्यता दिली होती. यामुळे कामात अनियमितता व नियमबाह्यपणे सीलबंद कपाटे उघडून पुराव्यामध्ये छेडछाड केल्याचे सकृत दर्शनी  दिसून आले आहे असे आदेशात म्हटले आहे. तसेच त्यांनी, योजनेच्या कामासंदर्भातील काही नस्त्या, दस्तऐवज जिल्हा परिषद कार्यालयाकडे जमा केलेले नाहीत. त्यांच्याविरोधात शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित आहे.

जाधव हे मूळचे कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथील आहेत. २००४ मध्ये सोलापूर जिल्हा परिषद येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. भोर, तासगाव येथे गटविकास अधिकारीपदी काम केले आहे. त्यांनी हातकणंगले पंचायत समिती येथे काही वर्षे गटविकास अधिकारी हाते. २०२० मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद येथे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली होती.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes