स्मॅक आयटीआयमध्ये दीक्षांत समारंभ उत्साहात,प्रशिक्षणाार्थ्यांना पुरस्कार वितरण
schedule27 Oct 24 person by visibility 138 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मुलींचा सहभाग वाढवावा तसेच व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी पुढे यावे असे आवाहन स्मॅक चे चेअरमन सुरेन्द्र जैन यांनी केले.
स्मॅक संचलित श्रीमती सोनाबाई शं. जाधव मूलभूत प्रशिक्षण केंद्र व स्व. जवानमलजी गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सन २०२४ आयटीआय अंतिम परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम व्यवसाय पूर्ततेची शासकीय प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा व संस्थेतील व्यवसायनिहाय यशप्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचा पुरस्कार वितरणाच्या दीक्षांत समारंभाच्या सोहळ्या प्रसंगी काढले.
या कार्यक्रमास स्मॅकचे माजी अध्यक्ष आर. बी. थोरात , निमंत्रित सदस्य प्रकाश चरणे, ज्येष्ठ उद्योजक तुकाराम पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. याप्रसंगी इलेक्ट्रिशियन , फिटर , मेकॅनिकल ड्राफ्ट्समन व वेल्डर या ट्रेड मधील प्रथम, द्वितिय, तृतीय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना गौरव सन्मानचिन्हे व शासनाकडून प्राप्त प्रमाणपत्रे ही देण्यात आली.
याप्रसंगी स्मॅक आयटीआयचे चेअरमन प्रशांत शेळके , स्मॅक संचालक राजू पाटील , शेखर कुसाळे , निमंत्रित सदस्य प्रकाश खोत , संजय भगत , विनय लाटकर , स्मॅक कमिटी सदस्य एम. वाय. पाटील उपस्थित होते.
आयटीआयचे प्राचार्य प्रसन्न वरखेडकर यांनी प्रास्ताविकात स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्था १९९४ पासून सुरु असून आज संस्थेस तीस वर्षे पूर्ण झाली आहे व आज पर्यंत संस्थेतून १,८०० प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण होऊन त्यातील शंभर विद्यार्थ्यांनी तर स्वतःचा व्यवसाय सुरू करून ते उद्योजक बनले आहेत व अन्य विविध नामवंत कंपनीमध्ये कार्यरत आहेत. आर. बी. थोरात म्हणाले, संस्थेतून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांसहित एकत्र असा उद्योजक मेळावा आयोजित करावा व संस्थेतील अनुभवांचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करून घ्यावा. त्यांनी यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभाशीर्वाद दिले. वीजतंत्री निदेशिका स्नेहल धने व फिटर निदेशक प्रीतम कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. बीटीपी चे वरिष्ठ निदेशक अण्णासो हसुरे यांनी आभार मानले.