विभागीय माहिती कार्यालयात संविधान दिन साजरा
schedule26 Nov 25 person by visibility 13 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कसबा बावडा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये कार्यरत असलेल्या विभागीय माहिती कार्यालय येथे आज संविधान दिन मोठ्या उत्साहात व श्रद्धापूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) प्रवीण टाके यांनी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दर्शविलेल्या मार्गावरून सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मार्गक्रमण करावे असे आवाहन केले. यावेळी सांगलीच्या जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, माहिती अधिकारी वृषाली पाटील, फारुख बागवान यांच्यासह विभागातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते .