कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे शिक्षक पुरस्कार जाहीर, शुक्रवारी वितरण
schedule26 Nov 25 person by visibility 20 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कास्ट्राईब शिक्षक संघटना, कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे क्रांतिबा जोतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदा वीस शिक्षकांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. तर क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल विशेष क्रीडा पुरस्कारही देण्यात येणार आहे. शुक्रवारी, (२८ नोव्हेंबर २०२५) दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे दुपारी बारा वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याची माहिती कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष नामदेवराव कांबळे व कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन यांनी पत्रकार परिषेदत दिली. महात्मा फुले यांचा १३५ वा स्मृतिदिन व संविधान सोहळानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व सिनीअर कॉलेजमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांची निवड केली आहे. मानपत्र, शाल, श्रीफळ, फेटा व पुस्तक भेट असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यंदा कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे. यंदा, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त बिद्री येथील केंद्रप्रमुख संजय कोंडिबा कुर्डूकर, संजय लक्ष्मण परीट, भोगावती महाविद्यालय कुरुकली येथील उपप्राचार्य डॉ. दिलीप लहू कांबळे, करवीर तालुक्यातील विद्या मंदिर गणेशवाडी येथील अध्यापिका रुपाली राजेंद्र कुंभार, विद्या मंदिर जेऊर येथील विषय शिक्षक अविनाश विष्णू माने, दुर्गमानवाड येथील केंद्र प्रमुख एकनाथ शंकर कांबळे, आजरा तालुक्यातील विद्या मंदिर गणेशवाडी येथील सुरेश तुकाराम देशमुख, विद्या मंदिर मिणचे खुर्द येथील किशोर रामचंद्र कासार, विद्या मंदिर तुर्केवाडी येथील विनायक बाबूराव प्रधान, हातकणंगले तालुक्यातील विद्या मंदिर न्यू राजापूर येथील प्रशांत श्रीकांत जयकर, विद्या मंदिर अतिग्रे येथील विषय शिक्षक तुकाराम गणपती माने, कुमार विद्या मंदिर हेब्बाळ येथील सरिता राजाराम कांबळे, विद्या मंदिर गेळवडे येथील नंदकुमार महिपती कांबळे, श्री जिनगोंडा बाळगोंडा हायस्कूल चिपरी येथील धनपाल दत्तात्रय कागवाडे, केंद्रीय शाळा नांदणी येथील संतोष विलास कांबळे यांना जाहीर झाला आहे. सातारा जिल्ह्यातल विद्या मंदिर कुसखुर्द येथील बाळकृष्ण आनंदराव भंडारे, सांगली जिल्ह्यातील ज्युबिल कन्या शाळा मिरज येथील विद्याधर जगन्नाथ रास्ते, रत्नागिरी जिल्ह्यातील रा. भा. शिर्के प्रशाला येथील प्रशांत चंद्रकांत जाधव, एन. के. वराडकर हायस्कूल मुरुड येथील मुख्याध्यापक प्रमोद प्रभाकर गमरे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक विद्यालय माडखोल येथील संजीव शंकर मोहिते यांना आदर्श शिक्षक पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. जलतरणमधील कामगिरीबद्दल सिद्धान्त पांडूरंग भोसले यांना विशेष क्रीडा पुरस्कार दिला जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस हे उद्घाटक आहेत. शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष आकाश तांबे हे प्रमुख पाहुणे आहेत. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांचे ‘राष्ट्पिता जोतिराव फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य एक चिंतन’ या विषयावर व्याख्यान आहे. पत्रकार परिषेदला बाबासो कांबळे, आकाराम कांबळे, गजानन कांबळे, दिनकर जगदीश, जनार्दन कोतेकर, विजय कांबळे-चोकाककर, पी. डी. सरदेसाई आदी उपस्थित होते.