नगरसेवक शारंगधर देशमुखांना पितृशोक
schedule11 Sep 24 person by visibility 573 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाचे कार्याध्यक्ष व टिंबर व्यावसायिक वसंतराव जयवंतराव देशमुख यांचे बुधवारी (११ सप्टेंबर २०२४) निधन झाले. मृत्यूसमयी ते ७६ वर्षाचे होते. गुरुवारी (१२ सप्टेंबर) रोजी सकाळी दहा वाजता अंत्ययात्रा आहे. ते दादा या नावांनी परिचित होते. स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांचे ते वडील होतं.
वसंतराव देशमुख हे विविध संस्थेशी निगडीत होतते मूळचे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील खुजगावचे. त्यांचा जन्म दोन जून १९४९ रोजी झाला होता. जुनी मॅट्रिकपर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यात तर कर्मभूमी कोल्हापूर ठरली. प्रारंभी त्यांनी मामांच्याकडे लाकूड वखारीत काम केले. दहा वर्षे काम केल्यानंतर १९७६ मध्ये त्यांनी, ‘श्रीराम टिंबर सॉ मिल’ या नावांनी व्यवसाय सुरू केला. श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
त्यांनी १९९० मध्ये स्थापन केलेली वसंतराव देशमुख हायस्कूल आज कोल्हापुरातील नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते. कोल्हापूर जिल्हा टिंबर व्यापारी व लघु औद्योगिक व्यापारी संघाचे ते अध्यक्ष होते. तसेच त्यांनी साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आहे. २००० मध्ये देशमुख सांस्कृतिक भवनची स्थापना केली. विविध संस्थेत सक्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातंवडे, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.