घोडावत विद्यापीठात फार्मसी डे निमित्त स्पर्धा उत्साहात
schedule09 Oct 23 person by visibility 358 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : घोडावत विद्यापीठात फार्मसी डे व फार्मा कोविजिलन्स सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये आंतरराष्ट्रीय सैंडोज फार्मसी कंपनी हैदराबादचे शास्त्रज्ञ समीर जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी फार्मसी विषयाचे महत्त्व,औषधांचे परीक्षण, वर्गीकरण, शरीरावर होणारे औषधांचे वाईट परिणाम, त्याचे मोजमाप संगणकाद्वारे कसे केले जाते याबाबत सविस्तर माहिती दिली.
फार्मसी डे निमित्त तुलसी ब्लड बँक जयसिंगपूर यांच्या सहकार्याने विद्यापीठातील 50 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. याचे उद्घाटन कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी केले. अवयव दान व फार्माकोव्हिजिलन्स विषयावरती रांगोळी प्रदर्शन, भित्तीपत्रक सादरीकरण, लघु नाटिका सादर झाले. अॅस्टर आधार हॉस्पिटलचे एमडी डॉ.सुहास दामले यांनी 'अवयव दान महादान' या विषयावर मार्गदर्शन कले.
दरम्यान विविध स्पर्धेमधील विजेत्यांचा सत्कार विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. सुभाष कुंभार,विभाग प्रमुख विद्याराणी खोत उपस्थित होत्या. कार्यक्रमास अकॅडमिक डीन डॉ. व्ही. व्ही.कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा.अश्विनी चकोते यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.शिवानी समर्थ यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.अवधूत अथणीकर, टी एस जंगम, प्रा.स्नेहा केटकाळे, प्रा. सुजाता खराडे यांनी सहकार्य केले.