Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक बँकेतर्फे नऊ टक्के व्याजदराने दहा लाख विनाकपात क्लिन कॅश क्रेडिट कर्ज - चेअरमन वर्षा केनवडे विवेकानंद कॉलेजची बारावी परीक्षेत यशाची परंपरा कायमगोकुळमध्ये रक्तदान शिबिर, ४०० रक्तदात्यांचा सहभाग गोकुळबद्दल सध्या काही बोलणार नाही, पण आमदार शिवाजी पाटलांचे आभार - हसन मुश्रीफांचा खोचक टोलामहावीर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेत यश बारावीत निकालात कोल्हापूर विभागाची घसरण, राज्यात सहाव्या स्थानावर देशभक्त रत्नाप्पाणा कुंभार कॉलेज ऑफ कामर्सचा निकाल ९४.१४ टक्के गोखले कॉलेजचे बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश,भूशास्त्र विषयात तेरा विद्यार्थ्यांना शंभर गुण*बापू गेले…*मेन राजाराम हायस्कूल -ज्युनिअर कॉलेजचे बारावी परीक्षेत घवघवीत यश

जाहिरात

 

शिक्षक बँकेतर्फे नऊ टक्के व्याजदराने दहा लाख विनाकपात क्लिन कॅश क्रेडिट कर्ज - चेअरमन वर्षा केनवडे

schedule03 May 26 person by visibility 283 category

महाराष्ट्र न्यूज वन  प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची शिखर संस्था असलेल्या  दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने  नऊ टक्के व्याजदराने दहा लाख विनाकपात क्लिन कॅश क्रेडिट कर्ज उपलब्ध केले आहे अशी माहिती बँकेच्या चेअरमन वर्षा केनवडे यांनी दिली आहे. एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य  साधून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केल्यानुसार सभासदांच्या कर्ज मयदित वाढ केली असून ५० लाखाचे मर्यादपर्यंत पगार तारण कर्ज वितरण केले जात आहे. बँकेकडे पगार असणाऱ्या सभासदांना पूर्वी आठ लाखांपर्यंत क्लिन कॅश क्रेडीट कर्ज मंजूर केले जात होते. पण संचालक मंडळाने एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून क्लिन कॅश क्रेडीट कर्ज मर्यादामध्ये बाढ करून आठ लाखावरून दहा लाख कर्ज मर्यादा केली आहे. तसेच  कर्जास १० टक्के व्याजदर होता व शेअर्स कपात २ टक्के होती ते यापुढे कर्ज व्याज दर ९ टक्के केला असून विना शेअर्स कपात कर्ज मंजूर केले आहे. तसेच सभासद बँकेकडे पगार खाते घेतील त्यांना बँकेमार्फत ४० लाख रुपये अपघात विमा मोफत मिळेल. विम्याचा हप्ता बँक  स्वखचर्चाने भरणार आहे.

तसेच सभासदांचे पाल्यांना शैक्षणिक व उच्च शिक्षणासाठी फी भरणे सोयीचे व्हावे यासाठी उत्कर्ष कर्ज योजनेतून शैक्षणिक कर्ज नऊ टक्के  व्याज दराने आदा केले जाईल. जेणेकरून सभासदांना पाल्यांच्या शैक्षणिक फीसाठी इतर बँकाच्याकडे जाण्याची गरज भासणार नाही. या संधीचा फायदा सभासदांनी घ्यावा असे आवाहन बँकेच्या चेअरमन केनवडे यांनी केले आहे.कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडीच्या समन्वयातून सभासदांच्या विश्वासावर सत्तेत आल्यावर तीन वर्षात बँकेची आर्थिक घडी यशस्वीरित्या बसवण्यात हे संचालक मंडळ यशस्वी झाले आहे. संचालक मंडळाने खर्चात काटकसर करून सलग तीन वर्षे समाधानकारक लाभांश दिल्यामुळे सभासदांमध्ये बँकेची विश्वासार्हता वाढली आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्मक विचार, विधायक कृती, काटकसर आणि सभासद हिताचा सहकार या विचारांना प्रमाण मानून केलेल्या सचोटीच्या व प्रामाणिक कारभाराचे हे फलित आहे.

बँकेच्या यशस्वी घोडदौडीस सर्व संचालक मंडळ, सुकाणू समिती व राजर्षी शाहू म्वाभिमानी आघाडीच्या सर्व नेत्यांचे मार्गदर्शन, सभासदांचा विश्वास व सेवकांच्या सहकायनि बँकेला उर्जित अवस्थेत आणले असून भविष्यात बँक  सहकारातील दीपस्तंभ होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्र करीत आहोत अशी माहिती बँकेचे चेअरमन केनवडे, व्हाइस चेअरमन पद्मजा मेढे यांनी दिली. याप्रसंगी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी संचालक  बाळासाहेब निंबाळकर, अर्जुन पाटील, सुनिल एडके, राजेंद्रकुमार पाटील, बाळकृष्ण हळदकर, शिवाजी रोडे पाटील सुरेश कोळी, एस.व्ही.पाटील, शिवाजी बोलके, रामदास झेंडे, बाबू परीट, नंदकुमार वाईंगडे, अमर वरुटे, गजानन कांबळे, गौतम बर्धन, तज्ञ संचालक सदानंद पाटील, तुकाराम मातले, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार मगदूम आणि सुकाणू समिती सदस्य उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes