महावीर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेत यश
schedule02 May 26 person by visibility 20 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महावीर महाविद्यालय, बी.एम. रोटे ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. कला शाखेचा निकाल ७५.२८ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ६८.१० टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल ९८.७६ टक्के इतका आहे. कला शाखेत गिरीता कोलतने ७७ टक्के, योगेश लिलाराम माळीने ७६.३३ टक्के गुण तर सृष्टी शिवाजी डकरेने ७३.६७टक्के गुण मिळवले. वाणिज्य शाखेत शंतनू किरण लोळगेने ७७. ५० टक्के गुण तर २ अंकुश अनिल लोंढेने ७५.१७ टक्के गुण तर मनिषा महेश जाधवने ७४.६० टक्के गुण मिळवले. विज्ञान शाखेत शलाका प्रमोद उनउनने ९५.५० टक्के गुण, आदिती सुरेश कापडीने ८८.५० टक्के गुण तर ऋतुजा दीपक खोतने ८६.६७ टक्के गुण मिळवले आहेत.