गोखले कॉलेजचे बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश,भूशास्त्र विषयात तेरा विद्यार्थ्यांना शंभर गुण
schedule02 May 26 person by visibility 110 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील नामांकित शिक्षण संस्था अशी ओळख असलेल्या गोपाल कृष्ण गोखले कॉलेजने बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. बारावी परीक्षेत गोखले कॉलेजमधील विज्ञान शाखेचा निकाल ९७. २८ टक्के इतका आहे. कला शाखेचा निकाल ७३.८६ टक्के तर वाणिज्य शाखेचा निकाल ६८.३३ टक्के इतका आहे. दरम्यान भूशास्त्र विषयात तेरा विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर गुण मिळाले आहेत.
विज्ञान शाखेत श्रुती गजानन खाडे 93.33 टक्के, आदिती अशोक धनवडे 84.3३ टक्के तर असीम गिरधारी निरंकारी या विद्यार्थ्याने ८३ टक्के मिळाले. कला शाखेचा निकाल 73.86 टक्के आहे. यामध्ये उत्कर्षा मिलिंद गुरव 83 टक्के, ऋतुजा मधुकर मुद्राळे 70 टक्के तर शुभम कृष्णात पाटील 63.50 टक्के इतके मिळवले आहे.वाणिज्य शाखा 61.16 टक्के इतका आहे. यामध्ये सचिन मारुती यादव 68.33 टक्के, यश प्रकाश व्हुनरे 68.17 टक्के, तर श्रेया रवींद्र मिस्त्री 64.83 टक्के इतके गुण मिळवले आहेत. एच एस व्ही सी शाखा 88.46 टक्के इतका आहे. यामध्ये संस्कार संजय रेडेकर (इलेक्ट्रॉनिक्स 66.50 टक्के), सोहम महादेव माळी (बँकिंग 66.17 टक्के ) तर अक्षरा अतुल देवेकर (बँकिंग 65.33 टक्के ) गुण मिळवले आहेत. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई ,चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे, पेट्रन कौन्सिल सदस्य दौलत देसाई ,प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, प्रभारी प्राचार्य डॉ.आर.बी. भुयेकर, पर्यवेक्षक एम. एल. धनवडे यांचे प्रोत्साहन व विशेष मार्गदर्शन लाभले.