देशभक्त रत्नाप्पाणा कुंभार कॉलेज ऑफ कामर्सचा निकाल ९४.१४ टक्के
schedule02 May 26 person by visibility 74 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल ९४.१४ टक्के लागला आहे. या परीक्षेस एकूण ६६६ विद्यार्थी बसले असून त्यापैकी ६२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर ३९ विद्यार्थी अनुत्तीर्ण राहिले आहेत. गुणांच्या वर्गवारीनुसार ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे १८ विद्यार्थी, ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे ११९ विद्यार्थी, तसेच ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे १८२ विद्यार्थी आहेत. याशिवाय ४५ ते ६० टक्के गुण मिळविणारे २३२ विद्यार्थी, तर ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळविणारे ७६ विद्यार्थी आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. गायत्री राजेंद्र यादव हिने ९४.६७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिच्या पाठोपाठ कु. तनिष्का सतीश माने (९४.५०%) द्वितीय, तर कु. सिद्धी भूषण धवते (९३.५०%) तृतीय क्रमांकावर आहेत. तसेच कु. श्रुती करण अंबले चतुर्थ व (९३%) आणि कु. अर्जुन अतुल देसाई (९२.६७%) पंचम स्थान पटकावले.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गणित, माहिती तंत्रज्ञान (आय.टी.) आणि मराठी या विषयांचा निकाल १०० टक्के लागला असून एम.सी.व्ही.सी. विभागाचाही निकाल १०० टक्के लागला. तसेच दोन विद्यार्थ्यांनी अकाउंटन्सी विषयांमध्ये १00 पैकी १00 गुण मिळवले आहेत. सदर यशामागे संस्थेचे सक्षम नेतृत्व व सर्व संबंधितांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि परिश्रम यांचे मोलाचे योगदान आहे. कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनी मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, संचालक अॅ ड वैभव पेडणेकर, अमित बाडकर व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा मैंदर्गी, उपप्राचार्य आर. एस. नाईक, ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य एम. पी. वंडकर, पर्यवेक्षक बी. डी. डवंग तसेच एम.सी.व्ही.सी. विभागाचे प्रमुख एस. इ. नाकील यांचे मार्गदर्शन लाभले.