मेन राजाराम हायस्कूल -ज्युनिअर कॉलेजचे बारावी परीक्षेत घवघवीत यश
schedule02 May 26 person by visibility 16 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ग्रामीण व शहरी संस्कृतीचा मिलाफ साधत १७४ वर्षाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या जिल्हा परिषद संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने बारावीच्या निकालाची गुणवत्तापूर्ण वैभवशाली परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा ९४.११ टक्के , वाणिज्य शाखेचा ९०.३६ टक्के असा उच्चांकी निकाल लागला. विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक जेबा इम्रान गडकरी ७६.५० टकके, द्वितीय क्रमांक कु. खदीजा समीर मोमीन ७२.८३ टक्के, तृतीय क्रमांक जुवेरिया नजीर बागवान ७२.१७ टक्के गुण मिळवले. कला शाखेतून प्रथम क्रमांक श्रुतिका जगन्नाथ कोंडा ७९.६७ टक्के, द्वितीय क्रमांक कु. आदिती संजय पाटील ६८.१७ टक्के, तृतीय क्रमांक सिमरन तानाजी वाघमारे ६६.५५ टक्के व वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक प्रीती विकास पाटील ७८.६७ टक्के, द्वितीय क्रमांक सुमित मधुकर जाधव ७७.८३ टक्के, तृतीय क्रमांक इकरा नसीर सय्यद ७७.५ टक्के गुण प्राप्त करत मिळवला आहे.१९ वर्षाखालील मुलींच्या शालेय खो-खो स्पर्धेत राष्ट्रीय संघाची कप्तान म्हणून खेळलेल्या कु. सानिका चाफे व महाराष्ट्र राज्य कप्तान अमृता बाबासो पाटील यांनीही परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.
या सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्राचार्य डॉ. गजानन खाडे, उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, विज्ञान वर्गशिक्षक प्रा.एच. एम.काटकर, प्रा.ए. व्ही. लाड कला वर्गशिक्षक प्रा. बी.टी.यादव, वाणिज्य वर्गशिक्षक प्रा.राहूल देशमुख तसेच सर्व विषय शिक्षक-शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारीजॅसमीन, शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांनी प्रोत्साहन लाभले.