गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकार
schedule19 May 26 person by visibility 21 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका हद्दीतील उचगाव महसुली क्षेत्रामधील गांधीनगर रोडलगतच्या मिळकतींमध्ये झालेल्या अनाधिकृत बांधकामांवर कोल्हापूर महानगरपालिकेकडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे. त्या कारवाईच्या अनुषंगाने संबंधित मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, या कारवाईविरोधात काही मिळकतधारकांनी हायकोर्टाच्या सर्किट बेंच, कोल्हापूर येथे याचिका दाखल करून कारवाईस स्थगिती देण्याची तसेच कारवाई रद्द करण्याची मागणी केली होती. या याचिकांवर मंगळवारी, सुनावणी पार पडली. यावेळी सर्किट बेंचने संबंधित कारवाईस कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यास कोल्हापूर महानगरपालिकेस सूचना केली. दरम्यान या याचिकेवर पुढील सुनावणी ९ जून होणार आहे.