Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेत महायुतीत मानापमान नाट्य, कार्यालय प्रवेश कार्यक्रमापासून शिवसेना नगरसेवक चार हात लांबसभागृह नेता, स्थायी समिती सभापतींचा कार्यालयीन प्रवेशईएसआय रुग्णालय - ओपीडीमधील समस्या तातडीने सोडवा : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची मागणीकोरे अभियांत्रिकीत सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यात निवडप्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावू या : अध्यक्षा शिल्पा खोत कलाकार - कामगारांचे स्वप्नं साकारण्यासाठी…वडिलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी महामंडळाच्या निवडणुकीत - संग्राम भालकरशिक्षक  - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही या पद्धतीने कामकाज करा, शिक्षक आमदारांच्या अधिकाऱ्यांना सूचनामहाव्दार रोड रिक्षा, चारचाकींसाठी खुला करावापश्चिम महाराष्ट्रातील पहिले इलेक्ट्रिक व्हेईकल प्रशिक्षण केंद्र विवेकानंद संस्थेतअभियांत्रिकी प्रवेशाच्या शंकांना मिळणार पूर्णविराम; केआयटीतर्फे रविवारी मोफत मार्गदर्शन कार्यक्रम

जाहिरात

 

ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सरकार सकारात्मक, वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी कार्यवाही - प्रताप सरनाईक

schedule19 May 26 person by visibility 100 categoryउद्योग

महाराष्ट्र  न्यूज वन प्रतिनिधी  : कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत भेट घेऊन ई-चलन प्रणाली, वेगमर्यादा नियम,  दंड आकारणी संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी परिवहन मंत्री सरनाईक यांनी वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या सह कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीचे अध्यक्ष  प्रदीप राठोड, सदस्य मनोज चौगुले, महेंद्र काळभोर, पंकज त्रिपाठी, अशोक शिंदे, गौरव कुसाळे, रफिक रावथर, अशोक कुचकोरवी, राजु ढाले, सुनील मगदुम आदी उपस्थित होते. जुन्या ई-चलनांची सरसकट रद्दबातल, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वेगमर्यादेचा पुनर्विचार, एएनपीआर कॅमेऱ्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा, वाहनांमधील अंतराच्या नियमांमध्ये व्यवहार्य बदल तसेच दंडावरील चक्रवाढ पद्धत रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले, “वाहतूक व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे वाहतूकदारांच्या अडचणी शासन गंभीरपणे ऐकत असून, नियमांची अंमलबजावणी करताना अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. ई-चलन आणि वेगमर्यादा संदर्भातील तक्रारींबाबत संबंधित विभागांकडून सविस्तर अहवाल मागवून आवश्यक त्या सुधारणा करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल.”

तसेच, रस्ते सुरक्षा अबाधित ठेवत वाहतूकदारांना दिलासा मिळेल, अशा पद्धतीने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मंत्री सरनाईक यांचे आभार मानत शासनाने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes