Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेत महायुतीत मानापमान नाट्य, कार्यालय प्रवेश कार्यक्रमापासून शिवसेना नगरसेवक चार हात लांबसभागृह नेता, स्थायी समिती सभापतींचा कार्यालयीन प्रवेशईएसआय रुग्णालय - ओपीडीमधील समस्या तातडीने सोडवा : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची मागणीकोरे अभियांत्रिकीत सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यात निवडप्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावू या : अध्यक्षा शिल्पा खोत कलाकार - कामगारांचे स्वप्नं साकारण्यासाठी…वडिलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी महामंडळाच्या निवडणुकीत - संग्राम भालकरशिक्षक  - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही या पद्धतीने कामकाज करा, शिक्षक आमदारांच्या अधिकाऱ्यांना सूचनामहाव्दार रोड रिक्षा, चारचाकींसाठी खुला करावापश्चिम महाराष्ट्रातील पहिले इलेक्ट्रिक व्हेईकल प्रशिक्षण केंद्र विवेकानंद संस्थेतअभियांत्रिकी प्रवेशाच्या शंकांना मिळणार पूर्णविराम; केआयटीतर्फे रविवारी मोफत मार्गदर्शन कार्यक्रम

जाहिरात

 

कृष्णराज महाडिक यांचा बार्शी - सोलापूर एसटी प्रवास

schedule18 May 26 person by visibility 224 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण व सार्वजनिक वाहतुकीच्या वापराच्या आवाहनाला प्रतिसाद देत, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आपल्या “युवा शक्ती जागर महाराष्ट्र दौऱ्या” दरम्यान, बार्शी ते सोलापूर हा प्रवास सर्व कार्यकर्त्यांसह राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसने केला.

केवळ भाषणांमधून नव्हे तर कृतीतून आदर्श निर्माण करण्याची परंपरा जपत, कृष्णराज महाडिक यांनी यापूर्वीही महाराष्ट्र दौऱ्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करून, पर्यावरणपूरक संदेश दिला होता. आज एस.टी.ने प्रवास करत त्यांनी साधेपणा आणि जनसामान्यांशी असलेली नाळ दाखवून दिली. तसेच राष्ट्रहितासाठी आवश्यक असलेल्या जबाबदारीची जाणीव कशी असावी, याचे उदाहरण राज्यातील युवकांसमोर ठेवले.

यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कृष्णराज महाडिक यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन हे केवळ शासनाचे धोरण नसून, प्रत्येक भारतीयाने आपल्या जीवनशैलीत स्वीकारण्याची  जबाबदारी आहे. युवा मोर्चाचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापराबाबत जनजागृती करतील, असेही त्यांनी नमूद केले.

“युवा शक्ती जागर महाराष्ट्र दौरा” अंतर्गत राज्यभर युवकांशी संवाद, संघटन मजबुतीकरण आणि समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यात येत असून, कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाला युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes