+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश
Screenshot_20240226_195247~2
schedule30 May 23 person by visibility 572 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
 "शासन आपल्या दारी" हे राज्यस्तरीय अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती सरकार कडून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मुख्यमंत्री शिंदे ११ जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, पेटाळा मैदानात सायंकाळी सहा वाजता सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.  
 या दौऱ्यासंदर्भात राजेश क्षीरसागर यांनी माहिती दिली. राज्य शासनाच्या वतीने राज्यात शासन आपल्या दारी अभियान राबविले जाणार आहे. याचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. शासनाच्या विविध योजना गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ठ आहे. याकामी कोल्हापूर जिल्ह्यात शिवदूतांची नेमणुकीचे काम अंतिम टप्प्यात असून, शिवदूत आणि शासन यांच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविल्या जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून ७५ हजार पेक्षा जास्त नागरिकांना या अभियानातून लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांची ११ जून रोजी सायंकाळी सहा वाजता पेटाळा मैदान येथे सभा होणार आहे. यामध्ये राज्यमंत्रीमंडळातील मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहे. या सभेस कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रथमच मुख्यमंत्री शिंदे यांचे कोल्हापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना - भाजप महायुतीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदे यांचे जल्लोषी स्वागत करण्यास सज्ज असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.