अभाविपतर्फे गुणवंत विद्यार्थी छात्र सोहळा उत्साहात
schedule09 Aug 26 person by visibility 20 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर आयोजित "छात्र गौरव २०२६" गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात झाला. विवेकानंद कॉलेजमधील प्राचार्य डी. ए. पाटील ग्रंथालय हॉल येथे कार्यक्रम झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या मंजिरी मोरे तसेच विवेकानंद महाविद्यालयाचे डॉ. सी. बी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अभाविपचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक प्रेम राजमाने यांनी प्रास्ताविक करत अभाविपची भूमिका विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम व 'छात्र गौरव २०२६' या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. व्यवस्थापन परिषद सदस्य मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राष्ट्रनिर्मितीत विद्यार्थ्यांच्या भूमिकेवर विचार मांडले. त्यानंतर इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत ७५ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पार्थ पाटील यांनी आभार मानले.