Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केएमटीचे १५६ कर्मचारी सेवेत कायम, राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावा ! कर्मचाऱ्यांचा शिवालयावर जल्लोष ! !राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे उमेदवारी मागणी अर्जास प्रारंभकोल्हापुरात शुक्रवारी एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग समिट २०२५-२६जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ, महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार ! धनंजय महाडिककोल्हापूर-इचलकरंजी महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान ! 16 जानेवरीला मतमोजणी ! !चिकोडे ग्रंथालयात 860 रक्तदात्यांनी केले रक्तदान महापालिका निवडणुकीची आज घोषणा, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद समाजातील कर्तबगारांची आदर्शवत कामगिरी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी- निवेदिता मानेचित्रकार भाऊसो पाटील यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शनशिवसेना ठाकरे पक्षाचा ३३ जागांचा प्रस्ताव, काँग्रेस समितीसोबत प्राथमिक चर्चा

जाहिरात

 

लंम्पीस्कीनच्या प्रतिबंधासाठी चेतन नरकेंनी सांगितली पंचसूत्रे

schedule22 Sep 22 person by visibility 649 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : प्रतिबंध हाच लम्पीस्कीनला रोखण्याचा उपाय आहे यासाठी कोरोनाच्या धर्तीवर लम्पीला हाताळण्याची गरज असल्याचे इंडियन डेअरी असोसिएशन आणि गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  लंपीस्किनला प्रतिबंध करण्यासाठी
 नरके यांनी पंचसुत्रीची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले. या पंचसुत्रीमध्ये लम्पिचा प्रसार रोखण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे यासाठी योग्य पद्धतीने वैरण आणि पाणी व्यवस्थापन करणे, रोगाचा प्रसार थांबवणे यासाठी गोठा परिसर स्वच्छ ठेवणे तसेच कोरडा ठेवणे, रोगाच्या प्रसारास प्रमुख कारणीभूत असणाऱ्या डास, गोचीड इतर कीटक यांचे निर्मुलन करणे आवश्यक आहे. तिसरा भाग म्हणजे १०० टक्के लसीकरण करणे आणि यासाठी एका जनावरासाठी एका सुईचा वापर करावे.जनावरामध्ये लक्षणे आढळताच तातडीने जनावराला विलगीकरणात ठेवणे आणि लक्षणे आढळताच आरोग्य यंत्रणेशी तातडीने संपर्क साधून औषधोपचार सुरु करणे. यासोबत प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोरने अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण पातळीवर सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आरोग्य विभाग आणि प्रमुखांची एक स्थानिक समिती स्थापन करून गावातील सर्व गोठ्यातील जनावरे त्यांचे आरोग्य याचे निरीक्षण आणि नोंदी ठेवून हालचालीवर लक्ष ठेवता येईल आणि लक्षणे आढळताच तातडीने मदत उपलब्ध करून देता येईल आणि विलगीकरण करणे गरजेचे.
यावेळी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण यांनी शासकीय स्तरावर केलेल्या उपाययोजना आणि नियोजनाची माहिती दिली. प्रत्येक तालुक्यात दूध संघ आणि शासनाच्या वतीने तालुका आणि विभागवार पथके निर्माण केली आहेत. त्या माध्यमातून पूर्णपणे मोफत लसीकरण, औषधोपचार दूध उत्पादकाच्या गोठ्यापर्यंत थेट पोहोचवण्यासाठी यंत्रणा प्रभावीपणे कार्य करत आहे. मृत जनावरांसाठी तीस हजार रुपयांची शासकीय मदत शासनाच्या वतीने दिली जात आहे. यासाठी लम्पिची लक्षणे दिसताच शासकीय यंत्रणांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes