चंद्रकांत पाटलांचा सेवाभावी उपक्रम, शहरात दुसरा मोफत फिरता दवाखाना !
schedule08 Nov 23 person by visibility 406 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील गोरगरीब वस्त्यांमध्ये आरोग्य विषयक सुविधा मिळाव्यात म्हणून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोफत फिरता दवाखाना संकल्पना अंमलात आणली. या अनोख्या आरोग्य विषयक उपक्रमामुळे रुग्णांना जलद सेवा मिळू लागली. या सेवाभावी उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी मंत्री पाटील यांना शहरात दुसरा मोफत दवाखाना सुरू केला आहे.
मंत्री पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापुरातील गोरगरीब वस्त्यांमध्ये एका सुसज्ज वाहनाच्या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा दिली जाते. शहरात विविध अशा २४ ठिकाणी हि रुग्णसेवा सुरु असून प्रत्येक ठिकाणी जवळपास १५० हून अधिक नागरिक या सेवेचा लाभ घेतात. या मोफत रुग्णालयाला लोकांचा प्रतिसाद वाढत आहे त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आणखी एका वाहनाचे लोकार्पण बुधवारी, आठ नोव्हेंबर रोजी राजेंद्रनगर येथे करण्यात आले. कोल्हापूर शहरातील गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी आता दोन फिरत्या मोफत रुग्णालयांची व्यवस्था मत्री पाटील प यांच्या योगदानातून झाली आहे.
या मोफत फिरत्या रुग्णालयाच्या लोकार्पणप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, महिला जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम, माजी नगरसेवक महेश वासुदेव, संग्रामसिंह निकम, सोमनाथ घोडेराव, दिलीप मैत्राणी, अभयकुमार वंटे, अभिजित पाटील, वैद्यकीय समन्वयक कक्षाचे राहूल चौगले, विजय पाटील उपस्थित होते.